DCM Ajit Pawar Takes the Charge Finance & Planning Ministry: उपमुख्यमंत्री अजित पवार( Ajit Pawar) आता राज्याचा आर्थिक कारभार पाहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमडळ बैठकीत आज नव्याने समावेश झालेल्या मंत्र्यांचे खातेवाटप झाले. या बैठकीनंतर राज्यपालांच्या मंजूरी आणि स्वाक्षरीसाठी मंत्र्यांची एक यादी राजभवनावर पाठविण्यात आली. राज्यपालांच्या सहीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. या वाटपात अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्री (Finance Minister) पदाची जबाबदारी आली. त्यानंतर काहीच वेळात अजित पवार यांनी पदभार स्वीकारला. राज्याच्या राजकारणात मोठे वलय असलेल्या अजित पवार यांच्याकडे कोणते खाते येते याबाबत उत्सुकता होती. रजिकीय वर्तुळात त्यांच्याकडे गृह किंवा अर्थ खाते जाईल अशी चर्चा अगोदरपसूनच होती. अखेर अर्थ खत्यावर शिक्कमोर्तब झाले.
अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याचा कारभार आल्याने शिंदे गटाची पुन्हा एकदा कोंडी झाल्याचे बोलले जात आहे. मुळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदार उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे झाले त्याला कारणच अजित पवार यांच्याकडून होत असलेली निधीचे असमान वाटप हे होते.आता तेच अजित पवार अर्थमंत्री म्हणून वाट्याला आल्याने शिंदे गटात अस्वस्थता पाहायला मिळत आहे.
अजित पवार यांना अर्थमंत्री म्हणून काम करण्याचा मोठा अनुभव आहे. राज्याच्या राजकारणात आणि विधिमंडळात विविध पदे आणि जबाबदाऱ्या सांभाळण्याचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. 1991 पासून विधानसभेचे सदस्य राहिलेले अजित पवार आपल्या स्प्टवक्तेपणासाठी आणि मोकळ्याढाकळ्या स्वभवासाठी ओळखले जातात. सोबतच प्रशासनावर असलेली पकड, वक्तशीरपणा, सडेतोड आणि हजजबाबीपणा ही त्यांच्या स्वभावाची काही वैशिष्टे आहेत. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: 16 आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस)
ट्विट
After announcement of portfolios, Maharashtra DCM Ajit Pawar takes the charge finance and planning ministry, he takes stock of current state finance @NewIndianXpress pic.twitter.com/hP9O5lociP
— Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) July 14, 2023
अजित पवार यांनी नुकतेच आपले काका शरद पवार यांना धोबपछाड देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारापासून फारकत घेत भाजपसोबत हातमिळवणी केली. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वतः सह नऊ सहकऱ्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांचा हा शपविधी कायद्याच्या कचट्यात अडकण्याची शक्यता आहे.कारण त्यांचे हे वर्तन पक्षविरोधी असून पक्षांतर कायद्याचे उल्लंघन असल्याचे शरद पवार गटाचा दावा आहे. परिणाम अजित पवार यांना न्यायालयाची पयरी आपल्या सहकाऱ्यासह चढावी लागू शकते.