DRI Seizes Gold प्रतिकात्मक प्रतिमा (PC -ANI)

DRI Seizes Gold: महसूल गुप्तचर संचालनालयाने (Directorate of Revenue Intelligence) देशभरात तीन ठिकाणी छापे टाकले. कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी तीन ठिकाणांहून 19 कोटी रुपयांचे सोने जप्त केले आणि 11 जणांना अटक केली. हे सर्व आरोपी स्मगलिंग सिंडिकेटचा भाग असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. डीआरआयच्या म्हणण्यानुसार, सिंडिकेटशी संबंधित हे आरोपी बांगलादेश सीमेवरून भारतात सोन्याची तस्करी करून मुंबई, नागपूर, वाराणसी इत्यादी ठिकाणी पाठवायचे.

नागपुरातून 8.5 किलो सोने जप्त -

अधिकृत प्रसिद्धीनुसार, डीआरआयने शुक्रवार आणि शनिवारी वाराणसी, नागपूर आणि मुंबई येथे समन्वित कारवाई करून रस्ते आणि रेल्वेद्वारे परदेशी मूळ सोन्याची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश केला. (हेही वाचा -Bomb Hoax Call: मुंबईच्या Taj Hotel मध्ये बॉम्ब ठेवल्याचा खोटा कॉल करून खळबळ उडवून देणार्‍या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या)

डीआरआयच्या नागपूर पथकाने शुक्रवारी सायंकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर दोन आरोपींना अटक केली. दोघे बंगालहून एक्सप्रेस ट्रेनने येत होते. या दोघांकडून पथकाने 8.5 किलो विदेशी सोने जप्त केले. वाराणसी येथील एजन्सीच्या पथकाने तीन तास कारच्या पाठलागानंतर अन्य दोन आरोपींना अटक केली. दोघांकडून 18.2 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेले सोने गाडीच्या हँडब्रेकखाली पोकळीच्या रूपात लपवण्यात आले होते.

शहरातील रस्त्यांवर पाच आरोपींना पकडण्यात मुंबईच्या पथकाला यश आले. हे आरोपी 4.9 किलो सोने घेऊन वाराणसीहून रेल्वेने प्रवास करत होते. या कारवाईत अकरा जणांना अटक करण्यात आली असून त्यात मुंबईतील पाच, वाराणसीतील दोन आणि नागपुरातील चार जणांचा समावेश आहे.