मनसेच्या दिपोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुक्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावल्यापासून राज्याच्या राजकीय वर्तुळात महायुतीच्या चर्चा रंगल्य़ा आहेत. कारण भाजप ही हिंदुत्वाच्या जोरावर फक्त राज्यात नाही तर संपूर्ण देशात राजकारण करते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनचं शिवसेनेतून बंड पुकारलं तर मनसेचा जन्मचं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन झाला. तिन्ही हिंदुत्ववादी पक्षाचे प्रमुख एकाचं व्यासपीठावर येणं ही राज्याच्या राजकारणातील मोठी बाब होती. तेव्हा पासूनच राज्यात भाजप, मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना या तिन्ही पक्षआंची युती होणार या चर्चाणा उधाण आलं होत. तर आज श्रीकांत शिंदेंनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी लावलेली हजेरी ही त्यावर शिक्कामोर्तब करणारी होती. या भेटनंतर अनेक तर्क वितर्क लढवल्या जावू लागले पण आता खासदार श्रीकांत शिंदेंनी खुद्द ट्वीट करत या भेटीमागचं कारण सांगितलं आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावर उपस्थित राहून विशेष भेट घेतली आहे. तरी या खास भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात महायुतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्वीट करत सांगितलं आहे की राजकारणाच्याही पलीकडे संस्कृती व आपुलकी असते.दिवाळी हा संस्कृती जपणारा सण. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. (हे ही वाचा:- CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, नक्षलग्रस्त भागातील पोलिसांसोबत साजरी करणार दिवाळी)

 

खासदार श्रीकांत शिंदेनी या भेटी दरम्यानचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे. ज्यात मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे, त्यांच्या पत्नी वृषाली शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे दिसुन येत आहे. या भेटीबाबत श्रीकांत ठाकरेंनी ट्वीट करुन स्पष्ट माहिती दिली असली तरी राज्याच्या राजकारणात शिंदे गट मनसेला टाळी देणार का यावरुन चर्चा रंगल्या आहेत.