राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान नक्षलग्रस्त भागातील पोलिसांसोबत (Police) मुख्यमंत्री शिंदे दिवाळी साजरी करणार आहेत. तरी कालचं देशाचे पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी कारगिरला (Kargil) जावून भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली. तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गडचिरोलीतील पोलिसांबरोबर (Gadchiroli Police) दिवाळी साजरी करणार असल्यानं मुख्यमंत्री पंतप्रधानांची कॉपी तर करत नाही आहे ना असा टोला विरोधकांकडून लगवण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री होण्यापूर्वीचं एकनाथ शिंदे आणि गडचिरोली जिल्ह्याचं विशेष नातं असल्याचं कायमचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात. कारण महाविकास आघाडी सरकारामध्ये (Maha Vikas Aghadi Government) एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. तेव्हाही ते कायमचं गडचिरोली जिल्ह्याचा (Gadchiroli District) दौरा करायचे. तरी हा दौरा काही नवीन नाही असं मत शिंदे गटाचं आहे.
मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) दुर्गम भागात नक्षलवाद्यांच्या गडात शिरून पोलिसांसोबत दिवाळी (Diwali Celebration) साजरी करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज गडचिरोली (Gadchiroli tour) जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त असलेल्या भामरागड तालुक्यातील दोडराज पोलीस (Dodraj Police) मदत केंद्रात पोहोचणार आहे. (हे ही वाचा:- Sharad Pawar On State Government: सध्याचे सरकार ठोस उपाययोजना करायला तयार नाही, शरद पवारांचे वक्तव्य)
आज महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) थेट नक्षलवाद्यांच्या गडात जाऊन पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी (Diwali Celebration) करणार आहेत. तरी या भागात पोलिसांचा मोठा सुरक्षा बंदोबस्त असणार आहे कारण या भागात कायमचं नक्षली कारवाया होत असतात त्यात आता थेट राज्याचे मुख्यमंत्री हजेरी लावणार म्हण्टल्यावर विशेष पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.