Mumbai Rape: मुंबईतील धक्कादायक घटना; आईसक्रिम देण्याच्या बहाण्याने चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार
Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या बलात्काराचे (Rape) सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच मुंबईच्या (Mumbai) साकीनाका (Saki Naka) येथून सर्वांनाच हादरून सोडणारी घटना उघडकीस आली आहे. या परिसरातील एका तरूणाने चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पालकवर्गांमध्ये भितीजनक वातवरण पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांच्या शेजारी राहतात. दरम्यान, पीडत मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपी तिच्याजवळ आला. तसेच चिमुरडीला आईसक्रीम देण्याचे आमिष दाखवत तिला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी घरी आल्यानंतर या घटनेबाबत तिने तिच्या आईला सांगितले. त्यानंतर पीडिताच्या आईने त्वरीत साकीनाका पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.या घटनेची गांभीर्याने दखल देत साकीनाका पोलीसांनी अवघ्या काही तासांतचं आरोपी तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारासह (POCSO) बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हे देखील वाचा- Pune: पतीची हत्या करून गुन्हा लपवण्यासाठी पत्नीने लढवली अनोखी शक्कल; ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

पुणे परिसरात काही दिवसांपूर्वी एका बिहारी मजुराने चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आले होते. कुरकुरे देण्याच्या बहाण्याने आरोपीने पीडितावर बलात्कार केल्याचे चौकशीतून समोर आले होते.