धक्कादायक! पुणे येथील लोणी परिसरामधील वसतिगृहात 20 वर्षीय विद्यार्थीनीची गळफास लावून आत्महत्या
Hanging (Photo Credits: Representative Image)

पुणे (Pune) येथे लोणी (Loni) परिसरामधील एका नामांकीत संस्थेत शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहात एका तरूणीने गळाफास घेऊ आपले जीवन संपवले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समलेले नसून लोणी काळभोर पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. वसतिगृह वार्डन नेहमीप्रमाणे सर्व मुलींची हजेरी घेत असताना अनेक मुली अनुपस्थित होत्या. दरम्यान, वसतिगृह वार्डनने सुरक्षा रक्षकाला गैरहजर असलेल्या मुलींना बोलवण्यास पाठवले. परंतु, एका खोलीतील मुलगी दरवाजा उघडत नसल्याचे सुरक्षा रक्षकाने वसतिगृह वार्डनच्या यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी संबंधित मुलीने फाशी घेतल्याचे त्यांना समजले.

लोणी काळीभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसतिगृह वार्डन सुजाता स्वामी यांनी या घटनेची माहिती दिली होती. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणीला विश्वराज रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, रूग्णालय प्रशासनाने ती मृत असल्याचे घोषीत केले. महत्वाचे म्हणजे, संबंधित तरुणीने कशामुळे आत्महत्येचा निर्णय घेतला? असा प्रश्न स्थानिक पोलिसांच्या समोर पडला आहे. तसेच या प्रकरणातील धागे-दोरे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. यासाठी विद्यार्थीनीच्या मित्र-मैत्रीणींकडे विचारपूर केली जात आहे. हे देखील वाचा- औरंगाबाद: देवदर्शन करून येत असताना क्रूझर कारच्या भीषण अपघातात 4 भाविकांचा मृत्यू

विलेपार्ले परिसरात गुरूवारी 30 जानेवारी रोजी माय-लेकीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मृतांच्या घरात दासी म्हणून काम करणारी बाई सकाळी 8.30 च्या सुमारास आली. तेव्हा दोघीही दरवाजा उघडत नसल्यामुळे तिने मृतांच्या नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर त्या दोघींनीही आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते.