शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अखेर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी आज सकाळी ही भेट झाली आहे. परंतु ही भेट फक्त दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्यासाठीच असल्याचं संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. इतकाच नव्हे तरी त्यांच्या या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
शिवसेना आणि भाजप यांची युती असली तरी दोन्ही पक्षात निवडणूक निकालानंतर मात्र वादाला सुरुवात झाली आहे. भाजपला 105 जागी विजय मिळून सुद्धा सरकार स्थापनेसाठी शिवसेनेची मदत घ्यावी लागणार आहे. परंतु शिवसेना पक्ष अंतर मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे राहावं यासाठी असून बसली आहे.
अशा एकंदर परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही विरोधी पक्ष शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी मदत करण्यास सकारात्मक असल्याची चर्चा सध्या आहे. त्यात आता संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.
शिवसेना सोडणाऱ्यांना कायद्याची पर्वा न करता तुडवा... बाळासाहेब ठाकरे यांचा 'तो' व्हिडिओ वायरल
राजकारणात सगळ्यांना पर्याय खुले असतात हे दाखवून देण्यासाठी तर ही बैठक नव्हती ना असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. त्यात अपेक्षा आमदारांनी साथ दिल्याने शिवसेनेची एकूण संख्या आता 63 झाली असून शिवसेनेला लहान समजू नये असा इशारा संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या भेटीद्वारे भाजपला दिला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.