एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) जोरदार आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना (Shiv Sena) भवनात भेटींगाठींचा सिलसिला कायम ठेवला आहे. तर आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा (Shiv Samvad Yatra) आयोजित करु महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. आदित्य यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातच सभा आणि मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे त्याला कट्टर शिवसैनिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळतो आहे. आदित्य ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्यानंतर तर काही शिवसैनिकांना भावना अनावर झाल्या. त्यांनी आपल्या अश्रुंना वाट मोकळी करुन दिली. या घटनेचे व्हिडिओही व्हायरल होत आहेत.
आदित्य ठाकरे यांनी आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पैठण येथील बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघातील बिडकीन येथे रोड शो केला. या वेळी बिडकीन परिसरात शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह पाहायला मिळाला. हा उत्साह कायम राहिल्यास संदीपान भुमरे यांच्या चिंता अधिक वाढण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Chandrakant Patil On CM Eknath Shinde: मनावर दगड ठेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद, चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवली भाजपमधील खदखद)
ट्विट
आदित्य ठाकरेंच्या शिव संवाद यात्रेत.. शिवसैनिक भावूक ....(व्हायरल व्हिडीओ )#Shivsena #AdityaThackeray #SanjayRaut #Maharashtra pic.twitter.com/sWNTL2Kcpg
— Mumbai Tak (@mumbaitak) July 23, 2022
आदित्य ठाकरे यांचे मराठवाड्यात औरंगाबादकडे येताना वैजापूर, खुलताबाद परिसरात शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले. या वेळी उपस्थितांसमोर बोलताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर टीकेचा भडीमार केला. पैठण, नेवासा, शिर्डी आदी ठिकाणीही आदित्य ठाकरे यांचे जोरदार स्वागत झाले. आदित्य ठाकरे यांचा रोड शो होता तव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गर्दी होती. शिवसैनिकांमध्येही जल्लोश संचारला होता. आदित्य यांच्या शिवसंवाद यात्रेला जर असाच प्रतिसाद मिळत राहिला तर शिंदे गटासाठी ही बाब मोठी चिंतेची ठरणार आहे. यात्रा