Maharashtra Political Crisis: शिवसेना मंत्री Eknath Shinde 'या' बंडखोर आमदारांना घेऊन नॉट रिचेबल, पहा संपूर्ण यादी
शिवसेना नेते एकनाथ शिंदे (फोटो सौजन्य-फेसबुक)

Maharashtra Political Crisis: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) 26 आमदारांसह सुरतला पोहोचले आहेत. काल रात्री विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच ते बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, उद्धव ठाकरे सरकारसाठी हे संकट त्याहूनही मोठे आहे. कारण, बेपत्ता झालेल्या नेत्यांमध्ये एकनाथ शिंदेच नव्हे, तर अब्दुल सत्तार आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांचाही समावेश आहे. देसाई हे उद्धव ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री आहेत. याशिवाय एकनाथ शिंदे यांचा मुलगा आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे हे सुरतच्या ला मेरिडियन हॉटेलमध्येही आहेत.

या नेत्यांच्या मुक्कामाची व्यवस्था गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांनी केल्याचे बोलले जात आहे. कोणत्याही राजकीय व्यक्तीने आमदारांशी संपर्क साधू नये यासाठी बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बेपत्ता आमदारांपैकी एकूण 15 नेते शिवसेनेचे आहेत. (हेही वाचा - Existing Politics in Maharashtra: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचे पडसाद, मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन शिष्टमंडळ सूरतला रवाना; NCP, काँग्रेसमध्ये बैठकांचा धडाका)

एकनाथ शिंद यांच्यासोबत सुरतमध्ये हे आमदार उपस्थित -

एकनाथ शिंदे

प्रकाश सुर्वे

महेश शिंदे

अब्दुल सत्तार (कॅबिनेट मंत्री)

शंभूराज देसाई (गृह राज्यमंत्री)

तानाजी सावंत

संजय शिंदे

संजय बांगर

संदिपान भुमरे

दयानेश्वर चौगले

भरत गोगावले

संजय राठोड

संजय रायमुलकर

चंद्रकांत पाटील (अपक्ष आमदार) बालाजी कल्याणकर

प्रकाश आनंदराव आबिटकर

संजय पांडुरंग

श्रीनिवास वनगा

संजय रायमुलकर

विश्वनाथ भोर

शांताराम मोरे

रमेश बोरनारे

अनिल बाबर

चिन्मनराव पाटील

महेंद्र दळवी

शहाजी पाटील

प्रदीप जैस्वाल

महेंद्र तुर्वे

किशोर पाटील

बालाजी किणीकर

संजय गायकवाड

सुभाष कांडे

खासदार श्रीकांत शिंदे (एकनाथ शिंदे यांचे पुत्र)

दरम्यान, 2019 मध्ये शिवसेनेने शिंदे यांना विधिमंडळ पक्षनेते केले. शिंदे हे ठाणे परिसरातील मोठे नेते मानले जातात. बाळा ठाकरे यांच्या काळापासून ते पक्षाशी जोडले गेले आहेत. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेने शिंदे यांना बाजूला केले, त्यानंतर ते नाराज आहेत.