महाराष्ट्रात आज शिवसेनेसाठी नवा दिवस असून सर्व शिवसैनिक मोठ्या उत्साहात आहेत. तर शिवतीर्थवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यासाठी मोठी जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे. याच पार्श्वभुमीवर मुंबईतील शिवसेना भवनाजवळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे फोटो असणारे पोस्टर्स झळकवण्यात आले आहेत. तसेच पोस्टरवर शरद पवार, जॉर्ज फर्नांडिस यांचे जुना फोटो सुद्धा दिसून येत आहे.
शिवसेनेने झळकवलेल्या पोस्टरवर असे लिहिण्यात आले आहे की, मा. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार, मुख्यमंत्री शिवसेनेचा. तसेच पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे इंदिरा गांधी यांचे अभिवादन करताना दिसून येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांच्या राजकरणाचे समर्थन बऱ्याच वेळा केले होते. 1975 मध्ये इंदिरा गांधी यांनी राज्यात लावलेल्या आणीबाणीचे सुद्धा समर्थन केले होते. पण त्यावेळी बहुतांश पक्षांनी याचा विरोध केला होता. एवढेच नाही भाजप पक्ष आल्यानंतर 1978 मध्ये इंदिरा गांधी यांना अटक केल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी याचा विरोधात बंद आयोजित केला होता.(Uddhav Thackeray Oath Taking Ceremony Live Updates: उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला कमलनाथ, भूपेश बघेल राहणार उपस्थित)
Mumbai: Poster featuring picture of Bal Thackeray and Indira Gandhi seen near Shiv Sena Bhawan
Read @ANI Story | https://t.co/PWOxD4aH8Q pic.twitter.com/Haso97sKQj
— ANI Digital (@ani_digital) November 27, 2019
भाजपने तोडफोडीचे राजकारण केले याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती. त्यावर निकाल देताना 27 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावे असे आदेश कोर्टाने दिले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. आता महाविकासआघाडी आपली सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. ज्या मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेन भाजपसोबतची युती तोडली, ती गोष्ट आता मोठ्या अभिमानाने शिवसेनेला मिळाली आहे. उद्धव ठाकरे यांनीही आपण मुख्यमंत्री पदाचा स्वीकार करतो असे सांगितले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही इच्छा उद्धव ठाकरे यांच्या रूपाने पूर्ण होणार आहे.