Uddhav Thackeray Oath Taking Ceremony Live Updates: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबासह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
महाराष्ट्र
Dipali Nevarekar
|
Nov 28, 2019 08:14 PM IST
Maharashtra Government Formation: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे 80 तासांंचे सरकार कोसळल्यानंतर आज महाविकासआघाडीच्या सरकारचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आज ( 28 नोव्हेंबर) सायंकाळी 6.40 वाजता उद्धव ठाकरेंचा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी शेतकर्यांच्या कुटुंबीयांसह देशातील दिग्गज राजकीय मंडळी उपस्थित राहणार आहे. दरम्यान शपथ विधी सोहळ्याच्या ठिकाणी सुमारे 2000 पोलिसांची फौज सज्ज आहे. तर नितीन देसाई यांनी शिवाजी पार्कवर खास थीमवर स्टेज उभारला आहे.
महाविकास आघाडी कडून शिवसेनेचा 5 वर्ष मुख्यमंत्री तर राष्ट्रवादी कडून उपमुख्यमंत्री आणि कॉंग़्रेस कडे विधानसभा अध्यक्ष पद देण्यात आलं आहे. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असून त्यांच्या सोबत तिन्ही पक्षांचे प्रत्येकी 2 नेते मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या सरकारला 3 डिसेंबर पर्यंत बहुमत सिद्ध करायचे आहेत. दरम्यान काल विधीमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन घेऊन 286 आमरादांचे शपथविधी पार पडले.
उद्धव ठाकरेंच्या रूपाने ठाकरे कुटुंबीयांतील पहिले ठाकरे थेट मुख्यमंत्री पदाच्या खूर्चीवर बसणार असल्याने आता शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नारायण राणे यांच्या नंतर 20 वर्षांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नेतृत्त्व करणार आहे.