Ashwani Kumar Suicide Case: अश्विनीकुमार यांची आत्महत्या! सीबीआयने पापण्यांची उघडझाप, हिमाचलातील 'नटी'ने भाष्य करावे- शिवेसना
Former CBI chief Ashwani Kumar | (Photo Credits: File Image)

सीबीआयचे माजी महासंचालक आणि नागालॅण्ड, मणिपूरचे माजी राज्यपाल अश्विनीकुमार यांनी आत्महत्या (Former CBI Director Ashwani Kumar Suicide) केली. शिमला येथील राहत्या घरात त्यांचा मृतदेह लटकताना आढळला. यावरुन शिवसेना मुखपत्र दै. सामना संपादकीयातून सीबीआय, केंद्र सरकार, भाजपा आयटी सेल आणि अभिनेत्री कंगना रनौत हिच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. 'सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणात वैद्यकीय अहवाल येऊनही अनेक जण ती आत्महत्या मानायला तयार नाहीत. हाथरसची तरुणी मराणाच्या दारातून सांगयेत माझ्यावर बलात्कार झाला. त्यावर सरकार विश्वास ठेवायला तयार नाही. आता सीबीआयचे माजी संचालक अश्विनीकुमार (CBI Director Ashwani Kumar) यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला. ते का मेले हे सत्य शोधण्यात कोणालाच रस नाही. काळ मोठा कठीण आला आहे हेच खरे!'. अश्विनीकुमार ( Ashwani Kumar) यांनी आत्महत्या का केली याचा शोध घेण्यासाठी सीबीआयने तरी पापण्यांची उघडझाप करावी आणि हिमाचलात वास्तव्यास असलेल्या 'नटी'ने (Kangana Ranaut) भाष्य करावे असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.

काय म्हटले आहे सामनात?

रहस्यमय आत्महत्या! अश्विनीकुमारांचे असे का झाले? या मथळ्याखाली लिहिलेल्या संपादकीयात म्हटले आहे की, 'सुशांतच्या आत्महत्येनंतर जे अनेक प्रश्न व शंका निर्माण केल्या गेल्या त्या अश्विनीकुमार यांच्याबाबतीतही निर्माण होऊ शकतात. सीबीआयचे माजी संचालक अश्विनीकुमार यांनी आत्महत्या केली आहे. देशाचे सामाजिक, राजकीय वातावरण बलात्कार, आत्महत्या अशा गढूळ झाले असतानाच अश्विनीकुमार यांचा मृतदेह त्यांच्या सिमल्यातील घरी लटकलेल्या अवस्थेत सापडावा हे धक्कादायक आहे. सीबीबआयच्या प्रमुख संचालकपदी काम केलेली व्यक्ती नैराश्येने ग्रासते, जगण्यासारखे काही उरले नाही, आयुष्याचाच कंटाळा आलाय म्हणून आत्महत्या करते यावर आपण सगळे डोळे मिटून विश्वास ठेवतो, हे काही पटत नाही. अश्विनीकुमार हे फक्त सीबीआयचेच संचालक नव्हते तर निवृत्तीनंतर ते नागालॅण्ड आणि मणिपूरचे राज्यपालही होते. ते हिमाचल राज्याचे पोलीस महासंचालक होते. दिल्लीतील प्रमुख राजकीय नेत्यांना विशेष सुरक्षा पुरवणाऱ्या एसपीजी गटात त्यांनी महत्तवाची कामगिरी बजावली आहे. म्हणजेच ते शरीराने खंबीर होते. त्यामुळेच सरकारने त्यांच्यावर विशेष जबाबदाऱ्या सोपवल्या. अशी व्यक्ती अचानक आत्महत्या करते. त्यावर कोणी प्रस्नचिन्ह निर्माण करत नाही याचे आश्चर्य वाटते.' (हेही वाचा, Kangana Ranaut, Hathras Gang-rape and Shiv Sena: कंगना रनौत हिच्यासाठी गळे काढणाऱ्यांवर शिवसेनेचे हाथरस प्रकरणावरुन प्रहार)

अश्विनीकुमार यांना खरेच आयुष्याचा कंटाळा आला की त्यांच्यावर कुणाचा दबाव होता, यावर सध्या हिमाचलात वास्तव्यास असलेल्या 'नटी'ने भाष्य केले पाहिजे. अश्विनीकुमार यांना कोणत्या परिस्थितीत आत्महत्या करावी लागली, हा प्रश्न कर्कश भुंकणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी विचारायला हवा. सुशांत प्रकरणात आत्महत्या नसून हत्याच आहे हे सिद्ध करण्यासाठी ज्यांनी जीवाचा आटापीटा केला त्यांनी सीबीआयचे माजी संचालक अश्विनीकुमार यांच्या आत्महत्येमागे काहीतरी रहस्य आहे कारस्थान आहे असे वाटू नये हे गौडबंगाल आहे.

मुंबईत सुशांतने आत्महत्या केली. त्याआधी काही दिवसांपासून तो निराश होता. अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. वृत्तवाहिण्या, भाजप आयटी सेल, त्यांचे पुढाराऱ्यांनी सुशांत प्रकरणातील अनेक रहस्ये, शोधून धोबीघाटावर आणली. तो रहस्यपट पाहून आफ्रेड हिचकॉक, शेरलॉक होम्स, जेम्स बॉण्डसारखे 'नायक'ही अचंबित झाले असतील. या सर्व हिचकॉक शेरलॉक होम्सच्या आवलादींना अश्विनीकुमारांच्या लटकलेल्या देहामागे एखादे रहस्य दलले आहे याचा सुगावा लागू नये? असा सवालही सामनातून विचारण्यात आला आहे.