केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचे नाव दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून आज या विषयावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी टीकेचे बाण सोडले आहेत. शिवसेनेतील फूटीनंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह कुणाकडे जाणार यासाठी निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात आली होती. त्यावर काल निवडणूक आयोगाने आपला निर्णय दिला आहे. दरम्यान सत्तासंघर्षाचा वाद अद्यापही सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. कोकण दौर्यावर असलेल्या संजय राऊतांनी आज हा प्रकार म्हणजे राजकीय हिंसाचार असल्याचं म्हटलं आहे. तसेच राष्ट्रपती, पंतप्रधान कार्यालयापासून सारी यंत्रणा यासाठी काम करत आहे, या देशातील राज्यशकट हे फक्त शिवसेनेला संपवण्यासाठी वापरलं जात आहे म्हणत त्यांनी घणाघात केला आहे.
शिंदे गटाच्या आमदार, खासदारांवर टीकास्त्र डागताना त्यांनी यांना चिन्ह, पक्षाचं नाव मिळालं तरीही ते पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत असं म्हटलं आहे. घटना, कायदा, लोकभावना पायदळी तुडवून तुम्ही हा निर्णय दिला आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
जर शिवसेना कुणाची हा प्रश्न निकाली काढायचा असेल तर आता निवडणूकीला सामोरं जा. जनता न्याय करेल. आमच्या पाठीशी जनमत असेल असेही संजय राऊतांनी आत्मविश्वासाने म्हटलं आहे. आम्ही फिनिक्स पक्षी ज्या प्रमाणे राखेतून झेपावतो, त्या प्रमाणं तडफेनं झेपावणार आहोत, असा विश्वास बोलून दाखवला आहे. नक्की वाचा: शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिलेल्या दिलासानंतर मंत्री Deepak Kesarkar यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक वार; पहा काय म्हणाले? (Watch Video) .
महाराष्ट्राच्या जनतेत भावनिक वातावरण आणि चीड आणि संतापाचं वातावरण आहे. या चीड आणि संतापातून पश्चिम बंगाल सारखा निकाल लागण्याची शक्यता आहे,