Eknath Shinde | (Photo Credits: Facebook)

Shiv Sena Convention in Kolhapur: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजप सरकारने चांगले काम केले आहे. राम मंदिर असो की, जम्मू कश्मीर येथील हटवलेले कलम असो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब असते तर त्यांनी पंतप्रधानांचे तोंडभरुन कौतुक केले असते. पण, आज अनेकांना राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) उभारल्याचे कौतुक वाटत नाही. हिंदुत्व आणि हिंदुहृदयसम्राट हे शब्द उच्चारायलाही अनेकांची जीभ कचरते, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान आणि भाजपचे कौतुक केले आहे तर उद्धव ठाकरे (Eknath Shinde On Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे दोन दिवसांचे महाअधिवेशन कोल्हापूर (Kolhapur) येथे पार पडत आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

'मातोश्री केवळ उदास हवेली'

कोल्हापूर येथील अधिवेशनातून बोलताना शिंदे यांनी मतोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले बाळासाहेब ठाकरे असताना 'मातोश्री' हे पवित्र मंदिर होते. आज तीच मातोश्री केवळ उदास हवेली झाली आहे. सातत्याने रडगाणे, आरोप, शिव्या आणि शाप तेथून ऐकू येतात, असे एकनाथ शिंदे म्हणाले. आज निष्पाप (Innocent) चेहरा घेऊन लोक (ठाकरे) पुढे येतात. पण ते दिसतात तसे नाही. त्यांच्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नका. त्यापाठीमागे अनेक चेहरे आहेत, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. (हेही वाचा, Aaditya Thackeray Nashik Daura: दिल्लीश्वरांना खुश करण्यासाठी लोटांगण; आदित्य ठाकरे यांची राज्य सरकारवर टीका)

राज्यातील जनता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोनदा फसवलं

आपल्यासोबत आहेत तोपर्यंत चांगले. सोडून गेले की ते गद्दार. सन 2019 मध्ये भाजपसोबत निवडणूक लढलीआणि सत्ता काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत स्थापन केली. म्हणजे लग्न एकासोबत आणि संसार दुसऱ्यासोबत केली. त्या वेळीही भाजपला आणि राज्यातील जनतेला फसवले. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यासोबत दिल्लीला गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बाहेर चर्चा केली. त्यानंतर दोघांना बाहेर बसवून एकटेच मोदींसोबत चर्चेसाठी आत गेले. बाहेर आल्यावर घामाने डबडबले होते. दोन ग्लास पाणी प्यायले. त्याही वेळी त्यांना सांगितले होते सोबत काम करु. म्हणजेच त्यांनी एकदा नव्हे तर दोन वेळा जनता, भाजप आणि नरेंद्र मोदी यांना फसवलं आहे, अशी जोरदार टीका शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. (हेही वाचा, CM Eknath Shinde On Aaditya Thackeray: सत्ता गेल्याने माशासारखे तडफडतात; एकनाथ शिंदे यांची आदित्य ठाकरे यांच्यावर टीका)

उद्धव ठाकरे यांना 2004 पासूनच सत्तेचा मोह

मला सत्ता नको होती. मला पदाचा मोह नव्हता. मला फक्त प्रेम पाहिजे होतं. पण, माला ते कधीही मिळाले नाही. मी कधीही पद, सत्ता मागितली नाही. सन 2019 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सत्तास्थापन केली तेव्हा मला सांगण्यात आले. मला (ठाकरे) मुख्यमंत्री करावे अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे, असे सांगितले. मी काहीही बोललो नाही. मी म्हणालो तुम्ही पुढे चला मी आपल्या सबत आहे, असे सांगितले. पण, जेव्हा भाजपसोबत जाण्याचा विषया आला तेव्हा ते मला म्हणाले पुढची अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देतील? तेव्हाच मला लक्षात आले पक्षप्रमुखांना सत्तेचा मोह आहे. त्यांना सत्तेचा मोह आज नव्हे 2004 पासूनच होता, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.