Uddhav Thackeray Meets Sanjay Raut Family: उद्धव ठाकरे यांनी घेतली संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट; 'मातोश्री' भावूक, पाहा फोटो
Uddhav Thackeray Meets Sanjay Raut Family |

संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्राचाळ घोटाळा (Patra Chawl Scam) प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) अटक केली. त्यामुळे दुखावलेल्या कुटुंबीयांना शिवसेना (Shiv Sena पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी भेट घेऊन धीर दिला. संजय राऊत यांच्या कुटुंबीयंची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे भांडूप येथील घरी गेले. उद्धव ठाकरे यांना पाहताच राऊत यांचे कुटुंबीय गहीवरले. खास करुन संजय राऊत यांच्या 'मातोश्री' भावूक झाल्याचे पाहायाल मिळाले.

संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले तेव्हा त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले. संजय राऊत यांचे औक्षण करुन त्यांनी राऊत यांना आशीर्वाद दिले. या वेळी राऊत यांनीही मातोश्रींना चरणस्पर्ष करत आशीर्वाद घेतले. उपस्थितांपैकी सर्वांसाठीच हा क्षण मोठा भावूक होता. संजय राऊत यांना उराशी कवटाळतानाचा त्यांच्या आईचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा, J.P. Nadda On Shiv Sena & Regional Parties: शिवसेना समाप्तीच्या दिशेने, देशात केवळ भाजप राहणार, काँग्रेससह सर्व प्रादेशिक पक्ष संपणार- जेपी नड्डा)

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राऊतांच्या कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला. ईडीची कारवाई म्हणजे ही एक सूडाने केलेली कृती आहे. ही एक लढाई आहे. संजय राऊत आपल्या पक्षासाठी लढाई लढत आहेत. त्यामुळे संकटात असलेल्या कुटुंबीयांच्या पाठिशी शिवसेना भक्कमपणे उभा असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी आपल्या कृतीतून दाखवले आहे.

संजय राऊत यांच्या घरी भल्या सकाळी पोहोचलेलेल्या ईडीच्या पथकाने तब्बल नऊ तासांपेक्षाही अधिक काळ मुक्काम ठोकला होता. त्यांची चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना ताब्यात घेतले. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी सुरु होती. रात्री उशीरपर्यंत ही करवाई सुरु होती. या प्रकरणात मनी लॉन्ड्रींग झाले असावे असा ईडीला संशय आहे.