Court | (Photo credit: archived, edited, representative image)

मुंबईमध्ये सन 2005 मध्ये झालेल्या मुंबई दंगल (Mumbai Riots) प्रकरणातील संशयीत आरोपींची तब्बल 19 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता केली आहे. निर्दोष मुक्तता झालेल्यांमध्ये अनिल देसाई (Anil Desai), रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्यासह शिवसेना पक्षाच्या 28 नेत्यांचा समावेश आहे. विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला. उल्लेखनीय म्हणजे हे सर्व नेते पक्ष फुटण्यापूर्वी शिवसेनेत होते. दरम्यान, आता पक्षात फूट पडल्याने दोन गट वेगळे झाले. परिणामी त्यातील काही नेते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) पक्षासोबत राहिले आहेत. तर त्यातील काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात गेले आहेत.

मुंबईत दंगलीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर खटला सुमारे 19 वर्षे चालला. मात्र, फिर्यादीच्या खटल्यातील अनेक तफावतींमुळे (तत्कालीन अविभक्त) शिवसेनेच्या 28 कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची निर्दोष मुक्तता केली. निर्दोष सुटलेल्यांमध्ये शिवसेनेचे (UBT) प्रमुख नेते अनिल देसाई आणि रवींद्र वायकर यांचा समावेश आहे. यापैकी देसाई हे उद्धव ठाकरे याच्या पक्षात असून लोकसभा निवडणूक 2024 मध्येते पक्षाचे विद्यमान उमेदवार आहेत. तर रविंद्र वायकर यांनी अलिकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. (हेही वाचा, Raju Waghmare Join Shiv Sena : काँग्रेस प्रतक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेनेत प्रवेश; नेत्यांच्या गलिच्छ राजकारणामुळे पक्ष सोडल्याचा केला खुलासा)

खासदार/आमदारांच्या खटल्यांसाठीचे विशेष न्यायाधीश आर एन रोकडे यांनी अभियोगाच्या कथनात अनेक विसंगती अधोरेखित करून निर्दोष मुक्तता जारी केली. कोर्टाने नमूद केले की वेगवेगळ्या फिर्यादी साक्षीदारांनी परस्परविरोधी साक्ष दिली. कोणतेही वैद्यकीय पुरावे सादर केले गेले नाहीत आणि मालमत्तांच्या कथित नुकसानीशी संबंधित महत्त्वपूर्ण वस्तू पोलिसांनी जप्त केल्या नाहीत.

शिवसेना नेते नारायण राणे यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर 24 जुलै 2005 रोजी उपनगरीय दादर येथे आयोजित मेळाव्यातून हे प्रकरण घडले. सध्या भाजपसोबत केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य असलेले राणे हे या रॅलीचा केंद्रबिंदू होते. दाखल फिर्यादीनुसार, दादरच्या सभेत राणे समर्थक आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. शिवसेना समर्थकांनी राणेंनी आयोजित केलेल्या मेळाव्यात व्यत्यय आणला, ज्यामुळे प्रतिस्पर्धी गटांमध्ये संघर्ष झाला. ज्यामध्ये काही शिवसैनिक जखमी झाल्याने परिस्थिती चिघळली आणि परिस्थिती चिघळली. सेनेच्या कार्यकर्त्यांनी दादर पोलीस ठाण्याचा घेराव करून परिसरातील वाहनांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण केला. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करून लाठीचार्ज केला. परंतु सेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करून, पोलिसांच्या मालमत्तेचे नुकसान केले आणि अधिकारी जखमी केले.

दाखल फिर्यादीनंतर पोलिसांनी सेनेच्या आंदोलक कार्यकर्त्यांवर भारतीय दंड संहितेच्या (IPC) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला. ज्यामध्ये बेकायदेशीरपणे सभा, दंगल, हल्ला, सार्वजनिक सेवकांना अडथळा आणणे आणि मुंबई पोलिस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झाले.