19 फेब्रुवारीला तारखेनुसार शिवजयंती साजरी केल्यानंतर महाराष्ट्रात आज तिथी नुसार शिव जयंती (Shiv Jayanti) साजरी केली जात आहे. ऐतिहासिक दस्ताऐवजांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन कृष्ण तृतीया दिवशी झाल्याचा उल्लेख असल्याने यंदा तिथीनुसार 21 मार्च दिवशी शिवजयंती साजरी केले जात आहे. राज्यात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्र सैनिकांना तिथीनुसारही शिवजयंती जल्लोषात साजरी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात शिवजयंतीचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आले होते.
शिवजयंती निमित्त शिवतीर्थावर ढोल ताशा पथकाच्या शिस्तबद्ध वादनाने सारा परिसर दुमदुमत होता. तर मनसेने आकर्षक सजावट केली होती. सारे मनसैनिक भगव्या फेट्यामध्ये उपस्थित होते. मनसेने या शिव जयंती निमित्त पार्कातील अश्वारूढ शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी देखील केली. हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थितांची गर्दी होती. दरम्यान शिवजयंती निमित्त मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उपस्थित महाराष्ट्र सैनिकाला एक शपथ देखील दिली आहे. या शपथेमध्ये शिवरायांच्या संकल्पनेमधील महाराष्ट्र साकारण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत याचे स्मरण त्यांनी कार्यकर्त्यांना करून दिले आहे. Shiv Jayanti 2022 Images: छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त खास मराठी Greetings, Wishes, Messages, Whatsapp Status शेअर करून साजरा करा शिवजन्मोत्सव!
शिवाजी पार्क वरील मनसेचं सेलिब्रेशन
View this post on Instagram
राज ठाकरेंनी दिलेली शपथ
View this post on Instagram
अमित ठाकरे शिवनेरीवर
View this post on Instagram
मुंबई मध्ये राज ठाकरे, शर्मिला ठाकरे यांनी शिवतीर्थावर शिवजयंती साजारी केली तर शिवनेरी वर राजपुत्र आणि मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शिवाई मंदिरात पूजा करून शिवजयंती सोहळ्याला सुरूवात केली. त्यावेळी उपस्थित शिवभक्तांसोबत त्यांनी काही काळ ढोल वादनाचा देखील आनंद लुटला.