शिर्डी (Shirdi) येथीस प्रसिद्ध साई मंदिरात आता एका वर्षाखालील मुलांना दर्शनासाठी नेल्यास त्यांची नोंदणी करावी लागणार आहे. याबद्दल साई संस्थाने हा निर्णय घेतला असून 1 जून पासून हा नियम लागू करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी साई मंदिरातील दानपेटीजवळ एक सहा महिन्यांची मुलगी सापडली होती. या प्रकरणी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या मुलीला एक महिला घेऊन आली असल्याचे दिसून आले. मात्र गर्दीचा फायदा घेत महिलेने या सहा महिन्याच्या मुलीला तिथेच ठेवून पळ काढला. त्यानंतर या मुलीला साई संस्थान यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. या मुलीची तपासणी केली असता तिला शिर्डीमधील चाईल्ड लाईन संस्थेत पाठवण्यात आले आहे.('वज्रेश्वरी' मंदिरातील दरोड्याचा म्होरक्या पोलिसांना आला शरण)
या प्रकारामुळे शिर्डीमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांकडून त्या महिलेचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे यापुढे एका वर्षाखालील मुलांना मंदिरात आणण्यापूर्वी त्यांची नोंदणी करावी लागणार आहे. तर नोंदणी करण्यासाठी भाविकांनी त्यांचा मोबाईल क्रमांक, पत्त आणि नाव रजिस्टर करावे लागणार आहे.