भिवंडीतील लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुरातन वज्रेश्वरी देवी (Vajreshwari Temple) मंदिरात 10 मे रोजी दरोडा पडला होता. ह्यात दरोडेखोरांनी तब्बल 10-12 लाखांची रक्कम लंपास केली होती. ह्या घटनेने हादरुन गेलेल्या नागरिकांसाठी फारच महत्त्वाची अशी बातमी आहे. ह्या दरोड्यातील मुख्य सूत्रधाराने स्वत: जव्हार पोलिसांसमोर येऊन शरणागती पत्कारली आहे.रमेश असे या दरोडखो-याचे नाव आहे . याप्रकरणात आतापर्यंत एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
वज्रेश्वरी मंदिरात १० मे रोजी पहाटे दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी दानपेट्या फोडून 10-12 लाखांची रक्कम लंपास केली होती. गणेशपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने दिवसरात्र तपास करून गोविंद गिंभल या 5 दरोडेखोरांना अटकही केली होती. तसेच त्यांच्याकडून पैसेही जप्त करण्यात आले होते. मात्र, गोविंदचा अत्यंत जवळचा नातेवाईक असलेला रमेश याच्यासह तीन आरोपी फरारी होते. गुन्हे शाखेकडून या आरोपींचा कसून शोध चालू होता.
मात्र रमेशने केलेल्या या वाईट कृत्यामुळे त्याने स्वत:च गुरुवारी जव्हार पोलिस ठाण्यात येऊन शरणागती पत्कारली. जव्हार पोलिसांनी पुढील कारवाईसाठी त्याला गणेशपुरी पोलिसांच्या स्वाधीन केले, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी दिली.
Bhiwandi Vajreshwari Temple Theft: वज्रेश्वरी देवी मंदिरात चोरांचा डल्ला, दानपेटी लुटून काढला पळ
रमेश हा शहापूर तालुक्यातील आघई गावातला असून, साफफाईचे काम करतो. त्याच्याविरुद्ध सिन्नर पोलिस ठाण्यात एक आणि वाडा पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रमेशच्या चौकशीतून दरोड्याबाबतची आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पोलिस या संपुर्ण घटनेबाबत अधिक तपास करीत आहे.