ठाणे : भिवंडी (Bhiwandi) परिसरातील प्राचीन वज्रेश्वरी देवी (Vajreshwari Temple ) मंदिरात पहाटे चोरांनी दरोडा घालून मोठे रक्कम लंपास केल्याचे वृत्त समोर येत आहे. माध्यमांच्या माहितीनुसार आज, शुक्रवारी पहाटे 3 च्या सुमारास चोरांनी दरोडा घालत साधारण 10 ते 12 लाख रुपयांचे दान लुटून नेल्याचे समजत आहे. यावेळी मंदिराच्या एका सुरक्षा रक्षकाने मध्यस्थी केली असता त्याला बेदम मारहाण करून मंदिरातील इतर सुरक्षारक्षकांना बांधून ठेवलं आणि दानपेट्या फोडून सगळा माल चोरी केल्याचे सांगण्यात येतेय.
प्राथमिक माहितीनुसार घटना घडतेवेळी किमान दहा ते पंधरा दरोडेखोर होते, अशी माहिती मंदिर संस्थानच्या एका सदस्यानं दिली. स्थानिक गुन्हे शाखेकडून दरोडेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. तूर्तास भिवंडी येथी गणेशपुरी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवण्यात आली असून, मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराचे रेकॉर्डिंग तपासण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षकांनी सांगितले आहे.
4 प्रेयसींवर आपली छाप पाडण्यासाठी चोरी करायचा नव्या कार, पोलिसांनी प्रियकराला ठोठावल्या बेड्या
दरम्यान भिवंडीतील या प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरावरील दरोड्याच्या घटनेच्या निषेधार्थ वज्रेश्वरी गावातील नागरिकांनी बंद पाळला आहे. यासंदर्भात माहिती देणारा एक फलक मंदिराच्या पायथ्याशी लावण्यात आला आहे.