Mumbai MHADA Lottery 2024: दिवाळीपूर्वी मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केलेल्यांना मिळू शकते आनंदाची बातमी! येत्या 27 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार तात्पुरती यादी

म्हाडा ही पहिली तात्पुरती यादी 27 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6:00 वाजता अधिकृत वेबसाइट https://housing.mhada.gov.in वर प्रसिद्ध करेल. यादी प्रसिद्ध केल्यानंतर, 29 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12:00 वाजेपर्यंत कोणतीही हरकत किंवा दावा ऑनलाइन नोंदवला जाईल.

Mumbai MHADA Lottery 2024: दिवाळीपूर्वी मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केलेल्यांना मिळू शकते आनंदाची बातमी! येत्या 27 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार तात्पुरती यादी
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : PTI)

Mumbai MHADA Lottery 2024: मुंबई म्हाडाच्या (Mumbai MHADA) 2030 घरांसाठी 9 ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. लॉटरीसाठी अनिवार्य ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11.59 वाजता बंद झाली. नोंदणी प्रक्रिया बंद झाल्यानंतर कोणीही सोडती प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाही. आता महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाचा मुंबई विभाग पुढील महिन्यात ऑक्टोबरमध्ये 2,030 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. अशाप्रकारे या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांना दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी मिळू शकते. मुंबई म्हाडा बोर्ड दिवाळीपूर्वी 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता तात्पुरती यादी प्रसिद्ध करणार आहे.

म्हाडा ही पहिली तात्पुरती यादी 27 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6:00 वाजता अधिकृत वेबसाइट https://housing.mhada.gov.in वर प्रसिद्ध करेल. यादी प्रसिद्ध केल्यानंतर, 29 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12:00 वाजेपर्यंत कोणतीही हरकत किंवा दावा ऑनलाइन नोंदवला जाईल. त्यानंतर स्वीकृत अर्जांची अंतिम यादी 3 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी 6:00 वाजता त्याच वेबसाइटवर पोस्ट केली जाईल.

मुंबई म्हाडा बोर्डाने 2,030 घरांसाठी अंतिम यादी जाहीर केल्यानंतर, 8 ऑक्टोबर 2024 ला लॉटरीची सोडत यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉइंट, मुंबई येथे सकाळी 11:00 वाजता काढण्यात येईल. घरांसाठी अर्ज करणारे लोक मंडळाच्या अधिकृत साईटला भेट देऊन लॉटरी पाहू शकतात. मुंबई म्हाडा मंडळाने यावर्षी 359 घरे आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गासाठी (EWS), 627 कमी उत्पन्न गटासाठी (LIG), 768 मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG), आणि 276 उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) आरक्षित ठेवली आहेत. (हेही वाचा: Mumbai New Ring Roads: मुंबईकरांना दिलासा! आता अवघ्या तासाभरात होणार संपूर्ण शहराचा प्रवास; MMRDA बांधत आहे 7 नवे रिंग रोड्स, जाणून घ्या मार्ग)

यंदा 29 लाख ते 6.82 कोटी किंमतीची 2 हजार घरे आहेत. उच्च उत्पन्न घरासाठी 1 ते 6 कोटींची घरे उपलब्ध आहेत. ही घरे अंधेरी, अ‍ॅन्टॉप हिल, जुहू, गोरेगाव, ताडदेव, विक्रोळी, पवई भागामध्ये उपलब्ध आहेत. मुंबई ताडदेवमध्ये सर्वात महागडे घर उपलब्ध आहे, ज्याची किंमत सुमारे 6.82 कोटी आहे. दक्षिण मुंबई मधील हे घर 1500 स्क्वेअर फूटचे आहे. या घरातून सीफेस आणि महालक्ष्मी रेसकोर्सचा भाग दिसतो.

(The above story first appeared on LatestLY on Sep 24, 2024 10:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).