शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शरद पवार उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार
शरद पवार (Photo credit : Youtube)

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) उद्या (27 मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार आहे. शरद पवार सध्या राज्यातील विविध ठिकाणी दुष्काळग्रस्त भागात जाऊन त्यांच्या समस्या निवारण करण्यास मदत करत आहेत.

तर आज इंदापूर येथे दुष्काळ दौऱ्यावर असताना काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे कर्जमाफी बद्दल मागणी केली. त्यामुळे आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच त्यांनी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे अशी विनंती फडणवीस यांच्याकडे करणार आहे.(महाराष्ट्रात शिवसेनेचा आवाज वाढला, जाणून घ्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांना किती टक्के मतं मिळाली?)

तसेच सरकारकडे मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा साठा आहे. त्यामुळे दुष्काळ परिस्थित जो पर्यंत राहणार आहे तो पर्यंत शासनाने अन्नधान्याचा पुरवठा अशा राज्यांना करावा अशी मागणी पवार शासनाकडे करणार आहेत. त्याचसोबत दुष्काळग्रस्त भागातील लोकांना त्यांना हवे तेवढे पाण्याचे टॅंकर पुरवणार असल्याचे आश्वासन शरद पवार यांनी केले आहे.