महाराष्ट्रात मागील विधानसभा निवडणूकांनंतर सुरू झालेला राज्यातला सत्तासंघर्षाचा खेळ विविध टप्य्यांवर बदलताना दिसला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणूकांनंतर राज्यातला राजकीय पेच सोडवण्यासाठी महाविकास आघाडीचा जन्म झाला पण आता 2024 ची विधानसभा निवडणूक (2024 Maharashtra Assembly Elections) कॉंग्रेस, एनसीपी आणि ठाकरे गट एकत्र लढणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे. शिवसेनेपाठोपाठ आता एनसीपी फूटण्याच्या चर्चा रंगत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्याबद्दल साशंकता व्यक्त केली आहे.
अमरावती मध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूका लढण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज आहे का? असा सवाल जेव्हा पत्रकाराने शरद पवार यांना विचारला तेव्हा त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे. 'आज आम्ही महाविकास आघाडीचा एक भाग आहोत आणि एकत्र काम करण्याची तयारी आहे. परंतु केवळ इच्छा नेहमीच पुरेशी नसते. जागावाटप, काही अडचणी आहेत की नाही? या सर्वांवर अद्याप चर्चा झालेली नाही. मग मी तुम्हाला याबद्दल कसे सांगू?' असं ते म्हणाले आहेत. Sharad Pawar-Gautam Adani Meeting: उद्योगपती गौतम अदानी आणि शरद पवार यांच्या भेट; गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा, राजकीय वर्तुळातही तर्कवितर्क .
पहा शरद पवार यांची प्रतिक्रिया
Today, we are a part of Maha Vikas Aghadi, and there is a willingness to work together. But desire alone is not always enough. The allotment of seats, whether there are any problems or not- all this has not been discussed yet. So how can I tell you about this?: NCP Chief Sharad… pic.twitter.com/kie6zYfwR1
— ANI (@ANI) April 24, 2023
शरद पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर महाविकास आघाडी घडवून आणण्यासाठी अग्रभागी असलेल्या संजय राऊत यांनी मात्र 2024 च्या विधानसभा निवडणूका महाविकास आघाडी एकत्र लढवेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
"Maha Vikas Aghadi will remain. Its prominent leaders are Uddhav Thackeray and Sharad Pawar. In 2024, MVA parties will fight (Maharashtra Assembly) election together," says Sanjay Raut, Uddhav Thackeray faction leader & MP. pic.twitter.com/DNBhJqbdIN
— ANI (@ANI) April 24, 2023
मागील काही दिवसांपासून संजय राऊत आणि अजित पवार यांच्यामध्ये काही मतभेद असल्याचं समोर आलं आहे. अजित पवारांनी राऊतांच्या काही भूमिकांवर आक्षेप घेत नाराजी मीडीया समोर बोलून दाखवली आहे. त्यामध्येच अजित पवार काही आमदारांनी घेऊन एनसीपी मध्ये बाहेर पडण्यासाठी जुळवाजुळव करणार असल्याच्याही चर्चा जोरात होत्या. पण त्या सार्यांना अजित पवार यांनी तूर्तास फेटाळून लावलं आहे.