Sharad Pawar-Gautam Adani Meeting: उद्योगपती गौतम अदानी आणि शरद पवार यांच्या भेट; गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा, राजकीय वर्तुळातही तर्कवितर्क
Sharad Pawar-Gautam Adani Meeting | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट (Sharad Pawar-Gautam Adani Meeting ) घेतल्याने राजकीय वर्तुळात आणि प्रसारमाध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहे. विशेष म्हणजे ही भेट 'वन टू वन' होती. त्यामुळे या भेटीत दोघांखेरीज तिसरा एकही व्यक्ती तिथे उपस्थित नव्हता असे समजते. काँग्रेस आणि विरोधक हिंडेनबर्ग प्रकरणांवरुन गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सत्ताधाऱ्यांना लक्ष करत आहेत. अशा वेळी त्याच उद्योगपतीने शरद पवार यांची भेट घेऊन दोन तास चर्चा केली. त्यामुळे शरद पवार यांच्या मनात आहे तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गौतम अदानी यांनी शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओक येथे जाऊन भेट घेतली. ही भेट सलग दोन तास चालली. सकाळी साधारण 10.10 वाजता सुरु झालेली ही भेट पुढे बराच काळ चालली. या भेटीवेळी पक्षाचे नेते आणि इतरांना कटाक्षाणे दुल ठेवण्या आल्याचे समजते. भेटीचा तपशील समजू शकला नाही. मात्र, काँग्रेसकडून गौतम अदानी यांना वारंवार लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. काँग्रेस आणि विरोधकांकडून उपस्थित केले जाणारे विविध मुद्दे, टीका आणि इतर विषयांवरही या भेटीत चर्चा झाली असावी असे समजत. अदानी प्रकरणाची चौकशी जेपीसी पेक्षा एखादी न्यायालयीन समिती नेमून करावी, असे मतही पवार यांनी व्यक्त केले होते. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. (हेही वाचा, Adani Companies Headquartered: अदानींच्या काही कंपन्यांची मुख्यालये मुंबईहून अहमदाबादमध्ये)

हिंडनबर्ग रिपोर्टनंतर गौतम अदानी एकदम प्रकाशझोतात आले. पण, पण वेगळ्या अर्थाने ते झाकोळूनही गेले. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या रांगेत पहिल्या क्रमांकापासून काही पावलेच दूर असलेले गौतम अदानी थेट तीसाव्या स्थानावर फेकेले गेले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारचे संसदेमध्ये अदानी प्रकरणावरुन जाहीर वाभाडे काढले. महाविकासआघाडीतील घटनक पक्ष असलेला उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षही अनेकदा अदानी मुद्द्यावरुन बोलत असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र अदानी प्रकरणावर जाहीर भाष्य करताना एकदाही दिसला नाही. उलट शरद पवार यांनी अदानी यांची पाठराखणच केल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर अदानी आणि पवार यांच्यात झालेल्या चर्चेककडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.