Satara Shocker: सातारा (Satara) जिल्ह्यातील सणबूर गावात एका कुटूंबातील सर्व सदस्य मृत्यूमुखी पडले आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. गावातील एका निवृत्त शिक्षकासह त्याची पत्नी, मुलगा आणि विवाहित मुलगी अश्या चौघांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. मृत झालेले आनंद जाधव हे गावातील शाळेतील निवृत्त झालेले शिक्षक होते. त्यांच्या जाण्याने गावकरांनी अनेकजण निरनिराळे तर्कवितर्क व्यक्त करताना दिसले. नेमकं अचानक या दुर्घटनेत झालं काय असा प्रश्न गावकऱ्यांच्या समोर उभा राहीला आहे. कुटूंबाच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट नाही.
गावाकरांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे रुग्णालयात त्यांच्यावर उपाचार चालू होते. प्रतिसाद मिळत नसल्याने नातेवाईक व कुटुंबीयांनी काल त्यांना डिस्चार्ज घेऊन गावी आणले. रात्री लाइट नसल्याने जनरेटर तसेच मिनी ऑक्सिजन मशिनचीही व्यवस्था घरात केलेली होती. रात्रीच्या उशीरापर्यंत नातेवाइकांशी जाधव कुटूंबीयांचे बोलत होते. अचानक सकाळी मात्र त्याच्या कुटूंबावर आघात झाल्याचे समोर आले आहे. कुटूंबाचे एकत्रीत जाण्यावरून गावकऱ्यांना देखील धक्का बसला आहे.
अचानक रात्री काय घडलं असेल असा प्रश्नचिन्ह गावकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. गावकऱ्यांनी लगेच पोलीसांना कळवले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतला. सर्व मृतदेह ताब्यात घेवू शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. चौघांच्या पोटात गेलेले पदार्थ विषघातक असेल असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. साताऱ्या जिल्ह्यातील या घटनेमुळे सर्वजण हादरले आहे.