Satara Accident: साताऱ्यातील (Satara) त्रिमली- घाटमथा रस्त्यावर भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. टेम्पोची धडक दुचाकीला लागल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने टेम्पोची धडक दुचाकीला लागली आणि या अपघातात दुचाकीवर असलेले तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. या अपघात प्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी दुचाकीने घाटमाथा येथून पुसेसावळी कडेगावच्या दिशेने दोघजण जात होते. दरम्यान, त्रिमली घाटमाथा रस्त्यावर समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, दुचाकीवरील दोघांना गंभीर जखम झाली, या दुखापतीत त्यांचा जागीच मृत्यू झाला.सानिया भोसले (२१), निखिल तिकुटे (२०) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ते दोघेही एकाच कॉलेजचे विद्यार्थी होते. त्यांना रुग्णालायत नेण्यापूर्वी मृत्यू झाला होता. (हेही वाचा-डोंबिवलीत शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा अपघात)
अपघाताची माहिती मिळताच, पोलिस घटना स्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. या प्रकरणी टेम्पो चालकवर अपघाताचा गुन्हा दाखल केला. सतीश भगत असं टेम्पो चालकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस पुढील कारवाई सुरु करत आहे. रात्री उशिरा दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.