जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात विविध पदांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम तारिख 15 मार्च ठेवण्यात आली आहे. तसेच उमेदवाराचे वय हे दिनांक 15 मार्च 2020 रोजी 18 ते 43 वर्ष असावे. एवढेच नाही तर उमेदवाराने शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. तर जाणून घ्या कोणत्या पदासाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. तसेच उमेदवार ज्या पदासाठी नोकरीचा अर्ज करणार आहे त्यासाठी काय अटी लागू करण्यात आल्या आहेत.
पदाचे नाव : सहाय्यक अभियंता (स्थापत्य) - (वर्ग-ब) - 03 जागा
▪शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
▪पदाचे नाव : सहाय्यक अभियंता (विवयां) - (वर्ग-ब) - 02 जागा
▪शैक्षणिक पात्रता : यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी पदवी
▪पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - (वर्ग-क) - 01 जागा
▪शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका किंवा तत्सम शैक्षणिक आर्हता
▪पदाचे नाव : लिपीक टंकलेखक - (वर्ग-क) - 05 जागा
▪शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अथवा तत्सम शैक्षणिक आर्हता, मराठी-इंग्रजी टाईपिंग तसेच संगणकाचे ज्ञान
▪पदाचे नाव : गाळणी निरीक्षक - (वर्ग-क) - 01 जागा
▪शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र या प्रमुख विषयासह विज्ञान शाखेची पदवी
▪पदाचे नाव : अनुरेखक - (वर्ग-क) - 01 जागा
▪शैक्षणिक पात्रता : शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण आणि संगणकामधील Auto Cad अभ्यासक्रम पूर्ण
▪पदाचे नाव : पंपचालक (श्रेणी-2) - (वर्ग-क) - 01 जागा
▪शैक्षणिक पात्रता : शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण आणि संगणकामधील Auto Cad अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.(महाराष्ट्रामध्ये लवकरच सामान्यांना 100 युनिट वीज मोफत देण्याचा सरकारचा विचार; उर्जामंत्री नितीन राऊत यांची विधानपरिषदेमध्ये माहिती)
तर उमेदवारांना अर्ज करायचा असल्यास त्यांनी http://bit.ly/2TmsqqN या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी http://bit.ly/2vBR7qf येथे भेट देण्याचे सांगण्यात आले आहे.