Uddhav Thackeray on JP Nadda | (Photo Credit: Archived, edited, representative images

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी शिवसेना आणि देशभरातील एकूण राजकीय पक्षांवर टीकात्मक भाष्य केले. हे सर्व पक्ष संपणार असून केवळ भाजपच राहणार असल्याचे नड्डा यांनी जाहीर केले. शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे थेट नाव घेऊन टीका केल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जे.पी. नड्डा यांच्यावर थेट निशाणा साधला. शिवसेना पक्ष संपवण्याचा प्रयत्न करुन दाखवाच असा थेट इशाराच उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिला. शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. त्यानंतर ठाकरे यांनी राऊत यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी सोमवारी (१ ऑगस्ट) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जे पी नड्डा यांनी म्हटले होते की, तब्बल 20 ते 30 वर्षे इतर पक्षांमध्ये काम करुनही लोक भाजपमध्ये येत आहेत. याचाच अर्थ त्या पक्षांमध्ये आता यांचं कर्तृत्व काही राहिलंच नाही. त्यांचं कर्तृत्व संपल्यानेच लोक पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. भाजपला वंशवादाविरुद्ध लढायचे आहे असेही नड्डा सांगतात. यावर उद्धव ठाकरे म्हणाले इतर पक्ष वंशवादी आहेत. तर मग भाजपचा वंश नेमका कोणता आहे? इतर सर्व पक्षांतून नेते भाजपने आयात केले आहेत. त्यामुळे भाजपचा नेमका वंश कोणता? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. (हेही वाचा, Uddhav Thackeray Meets Sanjay Raut Family: उद्धव ठाकरे यांनी घेतली संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट; 'मातोश्री' भावूक, पाहा फोटो)

जे. पी. नड्डा यांचे देशातील सर्व पक्ष संपणार आणि केवळ भाजप राहणार हे वक्तव्य म्हणजे देशाला हुकुमशाहीकडे नेणारे असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

ट्विट

दरम्यान, संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'संजय राऊत यांचा मला अभिमान आहे. केवळ बळ आहे म्हणून तुम्ही इतरांना संपवू पाहात असाल तर लक्षात ठेवा दिवस कुणाचेही कायम राहात नाहीत. जेव्हा दिवस फिरतील तेव्हा नड्डा काय करतील? असा सवालही जे.पी. नड्डा यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले आहे मी मरण पत्करेन पण शरण जाणार नाही. ते निर्भिड पत्रकार आहेत. त्यामुळेच ते असे म्हणू शकले असेही उद्धव ठाकरे म्हणाले.