Sanjay Raut: राज्यसभेत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर डागली टीकेची तोफ, महाराष्ट्र मॉडेलवरही केले भाष्य
Sanjay Raut (Photo Credits: PTI)

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सभागृहात मोदी सरकारवर (Modi Government) हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी देशातील कोरोनाची परिस्थितीचा मुद्दा उपस्थित करत केंद्रावर टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान संजय राऊत म्हणाले की, टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा मग शिव्या ऐकून घ्यावा लागतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्रम मोदी म्हणाले होती की, महाभारताचे युद्ध 18 दिवस चालले होते. कोरोनावर विजय मिळवण्यासाठी आम्हाला 21 दिवसांची गरज आहे. आम्ही नवीन आरोग्यमंत्र्यांना विचारत आहोत की, आणखी किती 21 दिवसांची आवश्यकता आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युंबद्दल संजय राऊत म्हणाले की, ' कोरोना महामारीमुळे आपण सर्वांनीच कोणाला तरी गमावले आहे. स्मशानभूमीत 24 तास मृतांची रांग लागली होती. गंगेच्या प्रवाहामध्ये कोरोनाचे मृतदेह सापडले. पण, मोदी जी वाराणसीत गेले आणि त्यांचे खूप कौतुक केले. गंगा माता खोटे बोलत होती का? असा प्रश्नही त्यांनी त्याठिकाणी उपस्थित केला. तसेच मोदी सरकार कोरोना मृत्युंचे आकडेवारी का लपवत आहे? कोरोनामुळे कित्येक लोकांनी प्राण गमावले आहेत. सरकारच्या अधिकृत आकडेवारीपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे रिपोर्टमध्ये दिसून येत आहे. हे देखील वाचा- Raj Thackeray: राज ठाकरे मनसे कार्यकर्त्यांना ऑफर, 'चांगलं काम करा, तुमच्या घरी जेवायला येतो'

याचदरम्यान, संजय राऊत यांनी देशात होणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणावरूनही केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, देशात किती टक्के लसीकरण झाले आहे? देशात लसीकरणाचा तुटवडा असून आज देखील लसीकरण केंद्रावर लोक लसीसाठी गोंधळ घालत आहेत. मात्र, आपण 6 कोटी लसी परदेशात पाठवल्या आहे. आपण 9 हजार मेट्रीक टन ऑक्सिजन परदेशात पाठवला आहे. यामुळे आपल्या आरोग्य यंत्रणेची संपूर्ण पोलखोल झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की महाराष्ट्र मॉडेल संपूर्ण देशात लावावे, तुम्ही लावाल का? हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे की, मुंबई मॉडेलचा तुम्ही वापर करा. हा चेन्नई उच्च न्यायालयाचा आदेश आहे की, मुंबई मॉडेल तुम्ही ऑक्सिनज वितरण आणि कोविड सेंटरबाबत म्हटले आहे. तुम्ही एकदा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश वाचा, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.