Raj Thackeray: राज ठाकरे मनसे कार्यकर्त्यांना ऑफर, 'चांगलं काम करा, तुमच्या घरी जेवायला येतो'
Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना मोठी ऑफर दिली आहे. राज ठाकरे हे पुणे (Pune) दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून विविध मतदारसंघातील आढावा घेतला. या वेळी राज ठाकरे यांनी तुम्ही चांगले काम करा. मी तुमच्या घरी जेवण करायला येईल, अशी ऑफर त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. राज ठाकरे यांची ऑफर शाखाध्यक्षांसाठी आहे. त्यामुळे राज यांच्या या ऑफरची मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

राज ठाकरे यांनी नुकताच नाशिक दौरा पूर्ण केला. नाशिक दौऱ्यानंतर ते आता पुणे दौऱ्यावर आहेत. काल (19 जुलै) पासून त्यांचा पुणे दौरा सुरु आहे. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. या दौऱ्यात त्यांनी मतदारसंघ निराय माहिती घेतली. तसेच, स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या समस्या आणि राजकीय वातावरण, जनतेचा कौल याबाबत माहिती जाणून घेतली. या वेळी त्यांनी पुने महापालिकेत मनसेची कामगिरी कशी आहे याबाबतही आढावा घेतला. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांन सांगितले की, तुम्ही चांगले काम करा मी तुमच्या घरी जेवायला येईन.

दरम्यान, येत्या काही काळात मनसेमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन आदित्य शिरोडकर यांनी नुकताच शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर अमित ठाकरे यांची निवड व्हावी अशी मनसेतील काही नेत्यांची इच्छा आहे. त्यांनी तशी मागणीही केली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे यावर काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहे.

नाशिक दौऱ्यादरम्यान, राज ठाकरे यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबतही चर्चा झाली. जवळपास 15 मिनिटांच्या या बैठकीत काय चर्चा झाली याबाबत कोणताही तपशील अद्याप बाहेर आला नाही. परंतू राजकीय वर्तुळात मात्र त्याबाबत जोरदार उत्सुकता आहे.