Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

मराठा (Maratha) समाजाप्रमाणेच धनगर (Dhangar) देखील आरक्षणासाठी आग्रही झाले आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जाती जमाती मधून आरक्षण मिळावं म्हणून सांगलीच्या (Sangali) जत (Jat) तालुक्यातील कुणीकोनूर येथील आबाचीवाडी भागात एका तरूणाने आत्महत्या केली आहे. हा प्रकार रविवार 22 ऑक्टोबरच्या रात्रीचा आहे. मृत तरूण 38 वर्षीय बिरूदेव वसंत खर्जे आहे.

आरेवाडी मध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्त्वाखाली धनगर समाजाचा दसरा मेळावा सुरू होता. या मेळाव्याचा व्हिडिओ बिरूदेवने पाहिली. त्यानंतर शेतामध्ये जाऊन झाडाला गळफास घेत त्याने आत्महत्या केली आहे. त्याच्या खिशाच्या पॅंट मध्ये सुसाईट नोट मिळाली आहे. यामध्ये त्याने धनगर आरक्षणासाठी जीवनयात्रा संपवत असल्याचं लिहलं आहे. सोबतच याबद्दल नातेवाईकांना त्रास देऊ नये असंही त्याने लिहलं आहे.

बिरूदेव खर्जे च्या आत्महत्या प्रकरणी उमदी पोलिस स्टेशन मध्ये घटना नोंदवण्यात आली आहे. बिरूदेवच्या पश्चात त्याची आई, वडील,पत्नी, 2 मुली आणि मुलगा असा परिवार आहे. नक्की वाचा: Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने संपवलं जीवन, नांदेडमध्ये २४ तासाच दोन आत्महत्या .

धनगरांना आदिवासी समूहातून आरक्षण मिळावे अशी मागणी आहे. त्यासाठी मागील 10 वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. भाजप नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आपल्याच सरकारच्या विरोधात दंड थोपाटले आहेत. महाराष्ट्रातल्या धनगरांची लढाई आपण न्यायालयात लढतोय. नाताळची सुट्टी झाल्यावर धनगर आरक्षणाचा निकाल येईल असं कोर्ट म्हणत असल्याचं त्यांनी काल मेळाव्यात म्हटलं आहे. धनगरांच्या प्रश्नासाठी त्यांनी हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेनेची स्थापना केल्याचंही काल सभेत उपस्थितांना संबोधित करताना म्हटलं आहे.