Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

Maratha Reservation: नांदेड येथे मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर पुन्हा तरुणाने टोकाचं पाऊल उचलले आहे. त्यामुळे नांदेड शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणाची मागणी पुर्ण व्हावी या करिता तरुणाने देखील धडपड करण्यास सुरुवात केली आहे. सर्व मराठा आंदोलकांकडून मराठा आरक्षणाची मागणी आणखी तीव्र होत आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाकडे सुसाईट नोट सापडली त्यात लिहल्याप्रमाणे, मराठा आरक्षणा मिळत नसल्याने मी विहरित उडी मारून जीव देत आहे.

मराठा आरक्षणासाठी तरुणांनी गेल्या काही दिवसांपासून टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवले आहे. मराठा आरक्षणाच्या संघटानांनी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. नायगाव येथील १६ वर्षाच्या विद्यार्थ्यी ओमकार बावणे याने आत्महत्या केली आहे. २२ ऑक्टोबरच्या रविवार सायंकाळी जंगली पीर जवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. विहरीवर एक चिठ्ठि सापडली, त्यात लिहल्या प्रमाणे "माझे आई वडिल मोलमजुरी करून आम्हाला शिक्षण शिकवत होते. पण त्यांची परिस्थिती मला पाहवतत नव्हती म्हणून आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी विहिरीत उडी मारून जीव देत आहे,' असा चिठ्ठीमध्ये उल्लेख केला आहे.

धक्कादायक म्हणजे आरक्षणप्रश्नी एकाच दिवशी नांदेड जिल्ह्यात दोघांनी आत्महत्या केली अजून याचा मराठा समाजाकडून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. या घटनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण मिळवून देईल अशी आश्वासन देण्यात आले आहे.