Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Maratha Reservation: गेल्या महिनाभर राज्यभरात आंदोलकाचे मराठा आरक्षणांसाठी (Maratha Reservation) प्रयत्न सुरु आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आरक्षणाची मागणी मराठा समाज एकवटला आहे. गेल्या काही दिवसांपासून तरुणांची मराठा आरक्षणासाठी अथक प्रयत्न चालू आहे.  आरक्षणची मागणी पूर्ण होत नसल्याने तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे.नांदेडमधील तरूणाने स्वत:चे आयुष्य संपवले आहे. विष प्राशान करून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडमधील हदगांव तालुक्यातील वडगाव येथे ही घटना घडली. शुभम सदाशिव पवार असं या मृत तरुणाचे नाव आहे. शुभमनं आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईट नोट लिहली त्या नोटमध्ये मराठा आरक्षणाला मागणी देण्याची विनंती केली आहे. शुमनच्या जाण्याचे त्याच्या आई वडिलांवर दुखाचा डोंगर पडला आहे. त्यामुळे मराठा संघटनांकडून हदगांव तामसा इथे बंद पाळला जाणार असल्याची घोषणा गावांत करण्यात आली आहे.

दरम्यान काही दिवसांपुर्वी बीड मध्ये एका तरूणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न अयशस्वी ठरला. दुसरा प्रयत्म यशस्वी ठरला. मराठा आरक्षणासाठी तरुणाने जीव दिला अशी चर्चा गावात चालू होती. मराठा आरक्षणासाठी आणखी किती तरुणाला जीव गमावावा लागणार आहे असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे.