बहुप्रतिक्षित समृध्दी महामार्गाच्या उद्धाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. स्वतंत्र्यदिन नंतर दिवाळीला महामार्गाचा लोकार्पण सोहळा पार पडेल अशी चर्चा होती. पण मोठ्या प्रतिक्षेनंतर ११ डिसेंबर रोजी संकष्टीचा मुहूर्त साधत समृध्दी महामार्गाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृध्दी महामार्गाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. तरी या उद्घाटन सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान समृध्दी महामार्गासोबतचं नागपूर मेट्रो रिच २ आणि रिच ३ चा उद्घाटन सोहळा देखील पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज समृद्धी महामार्गावरील कार्यक्रम स्थळाची पाहणी केली.
समृध्दी महामार्ग उद्घाटन सोहळ्यास 20 हजारांहून अधिक नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचा उद्घाटन सोहळा ११ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. पुढील टप्प्याचं बांधकाम पूर्ण होताचं शिर्डी ते मुंबई हा टप्प्याचा लोकार्पण सोहळा देखील लवरकचं पार पडणार आहे. ११ डिसेंबर रोजी होणार असलेल्या उद्घाटन सोहळ्याची संपूर्ण तयारी खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्रई देवेंद्र फडणवीस करताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांचा महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. नागपूर (Nagpur)- मुंबई (Mumbai) दरम्यान रहदारी सुलभ व्हावी या उद्देशानं 31 जुलै 2015 रोजी 701 किलोमीटरच्या 'समृद्धी महामार्गाची' घोषणा विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी केली होती. राज्याच्या 10 जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जात असला तरी एकूण 24 जिल्ह्यांना या महामार्गाचा फायदा होणार आहे. (हे ही वाचा:- Nagpur-Mumbai Train: मध्य रेल्वेकडून नागपूर-मुंबई रेल्वे मार्गावर 10 अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय)
LIVE | Media interaction in #Nagpur https://t.co/m5b6bztvuW
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 3, 2022
बहूचर्चित समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) लोकार्पणाची वाट फक्त नागपूर (Nagpur) किंवा मुंबईकरचं (Mumbai) नाही तर संपूर्ण देश पाहत आहे. कारण या मार्गाद्वारे एक लांब अंतर अगदीच कमी वेळात पार पाडता येणार आहे. मुंबई-छत्तीसगढ (Chhattisgarh) किंवा मुंबई-मध्य प्रदेश (Madhya Pradesh) या मार्गावरील वाहतूक सुध्दा आता या महामार्गाच्या माध्यमातून अगदी जलद गतीने होणार आहे.