नागपूर-मुंबई (Nagpur-Mumbai) रेल्वे मार्गावर अगदी बोटांवर मोजता येईल एवढ्याचं रेल्वे गाड्या या मार्गावर धावतात. पण विदर्भातून (Vidarbh) मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. नागपूर (Nagpur) मुंबई (Mumbai) हे अंतर देखील अधिक आहे. म्हणजेचं महाराष्ट्राचं (Maharashtra) एक टोक म्हणजे नागपूर तर दुसरं टोक म्हणजे मुंबई. जवजवळ ९०० किमीचा प्रवास रस्त्याने कापायला १६ तासांहून अधिक कालावधी लागतो. तर एसटी बस (ST Bus), खासगी बस किंवा विमानाची (Flight Ticket) तिकीट परवडण्या सारखी नसते. नागपूर मुंबई हे अंतर गाठण्यासाठी सर्वात सोयिस्कर आणि सर्वसामान्यांना परवडेल असा प्रवास म्हणजे रेल्वे प्रवास. विदर्भातील अनेक विद्यार्थी (Students), चाकरमानी मुंबई नागपूर प्रवास करतात. पण या मार्गावर रेल्वे कमी असल्याने तिकीट बुकींगसाठी (Ticket Booking) कायमचं मारामार असते. म्हणूनचं मध्य रेल्वे कडून मुंबई-नागपूर मार्गावर धावणाऱ्या रेल्वे संबंधीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वेने (Central Rialway) नागपूर-मुंबई रेल्वे मार्गावर 10 अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर ते मुंबई या मार्गावर १० वाढीव गाड्या फक्त 5 दिवसांसाठी चालवण्यात येणार आहेत. कारण ६ डिसेंबर म्हणजेचं महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभुमिवर दाखल होणाऱ्या भिम प्रेमींची मोठी गर्दी असणार आहे. दरवर्षी नागपूरातून अनेक भीमप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना (Dr. Babasaheb Ambedkar) नमन करण्यासाठी चैत्यभुमिवर दाखल होतात. त्या पार्श्वभुमिवरचं हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (हे ही वाचा:-Mumbai-Nagpur Bullet Train: मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा मार्ग 10 जिल्ह्यातून जाणार, 766 किलोमीटर लांबीचा कॉरिडॉर, DPR तयार)
नागपूर रेल्वे स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबईपर्यंत तीन विशेष गाड्या धावणार आहे. तर सहा विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई / दादर ते सेवाग्राम / अजनी / नागपूर या मार्गावर धावणार आहे. तसेच एक विशेष गाडी अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत असेल. ४ ते ८ डिसेंबर दरम्यान मध्य रेल्वे कडून या अतिरीक्त गाड्या धावणार आहेत. तरी या गाड्यांचं सविस्तर वेळापत्रक IRCTC या भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर सविस्तर देण्यात आलं आहे.