मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी नवी आणि आक्रमक भूमिका मांडली आहे. मराठा आरक्षण प्रश्नी येत्या 16 जून पासून आंदोलनास सुरुवात होत आहे. या आंदोलनाबाबत माहिती देताना संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे की, हे आंदोलन कोल्हापूर येथून सुरु होईल. आता यापुढे समाज बोलणार नाही तर लोकप्रतिनिधी अलेले आमदार आणि खासदार तसेच मंत्री बोलतील. जर समाजाच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मंत्रालयापर्यंत लॉन्ग मार्च काढण्याचा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी या वेळी दिला.
कोल्हापूर येथे मराठा समन्वयकांची एक बैठक पार पडली. या बैठकीत संभाजीराजे छत्रपती बोलत होते. या वेळी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी मूक आंदोलन छेडणार असल्याची माहिती दिली. हे आंदोलन 16 जूनलाहोणार आहे. आंदोलनाची सुरुवात कोल्हापरू येथील शाहू महाराज यांच्या समाधीस्थळापासून सुरु होईल. पुढे हे आंदोलन महाराष्ट्रातील जवळपास 36 जिल्ह्यांमध्ये केले जाईल. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आतापरंयत समाज खूप बोलत आला. यापुढे समाज बोलणार नाही. आता आपण नाही तर आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आमदार, खासदार आणि मंत्र्यांनीच घ्यायला हवी असेही संभाजीराजे भोसले यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, 'मी कोणत्या नवाज शरीफला भेटायला गेलो नव्हतो'; पीएम नरेंद्र मोदींची भेट घेतल्यावर CM Uddhav Thackeray यांची प्रतिक्रिया)
मराठा समाजाच्या मागण्या व्हायला हव्यात. त्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुण्यापासून मंत्रालयापर्यंत लॉन्ग मार्च काढण्याचा निर्धारही संभाजीराजे भोसले यांनी या वेळी व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण संदर्भात महाराष्ट्रातील विविध घटकांना भेटत आहेत. या आधी त्यांनी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, विविध राजकीय पक्ष, संघटना यांचे प्रमुख नेते आदी मंडळींची भेट घेतली आहे. त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान मराठा आरक्षण मुद्द्यावर उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे यांच्यातही भेट होणार आहे. पुणे येथे ही भेट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.