Sachin Vaze Case: पोलीस आयुक्त Parambir Singh मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीस; मुंबईला भेटू शकतात नवे पोलीस आयुक्त, 'या' अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा
CM Uddhav Thackeray, Mumbai Police Commissioner Param Bir Singh | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) परमबीर सिंह (Parambir Singh)  हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी 'वर्षा' बंगल्यावर पोहोचले आहेत. या भेटीत नेमके काय होते याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, या प्रकरणात परमवीर सिंह यांची बदली होऊन मुंबईला नवे पोलीस आयुक्त मिळण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, सचिन वाझे प्रकरण (Sachin Vaze Case) हे मुंबई पोलीस (Mumbai Police ) दलाला चांगलेच महागात पडण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणावरुन महाराष्ट्र पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जाण्याची शक्यता आहे. यात प्रामख्याने मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. मुंबई पोलीस आयुक्तांची बदली होणार की नाही याबाबत अद्याप कोणतेही ठोस वृत्त पुढे आले नाही. मात्र, जर ही बदली झाली तर मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी अनेक अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत. कोण आहेत हे अधिकारी ज्यापैकी एकाची निवड मुंबई पोलीस आयुक्त म्हणून होऊ शकते. घ्या जाणून.

सचिन वाझे हे प्रकरण अधिक पुढे वादग्रस्त ठरले तर त्याचे सर्व बिंब हे मुंबई आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे एक बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. (हेही वाचा, Sanjay Raut यांचा केंद्रावर पुन्हा हल्लाबोल; महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणा पाठवून महाविकास आघाडी सरकार आणि Mumbai Police यांच्यावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न.)

मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी चर्चेत असलेले अधिकारी

  • रजनीश सेठ
  • डॉ. के. वेंकटेशम
  • जयजीत सिंह
  • सदानंद दाते
  • विवेक फणसाळकर
  • ​बी. के. उपाध्या

​उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या भरेली स्कॉर्पिओ गाडी उभा राहिल्याचे आढळून आली. या घटनेपासून सुरु झालेले हे प्रकरण मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणानंतर अधिकच गडद झाले. या प्रकरणात एपीआय सचिन वाझे यांचे नाव पुढे आले. सध्या वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. त्यांची चौकसी सुरु आहे. वाझे यांचे निलंबनही झाले आहे. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे. हे प्रकरण आता पुढे कोणत्या स्तराला जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.