Lucknow Super Giants vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 16 वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Lucknow Super Giants vs Mumbai Indians) यांच्यात भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ (Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium, Lucknow) येथे खेळवला जाणार आहे. या हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, दीपक चहर, विघ्नेश पुथूर
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश सिंग राठी, आकाश दीप, आवेश खान
🚨 𝑻𝑶𝑺𝑺 𝑼𝑷𝑫𝑨𝑻𝑬 🚨
A mouth-watering IPL 2025 clash at Ekana Cricket Stadium awaits! 🏟️🤩
MI skipper Hardik Pandya has won the toss and elected to bowl against LSG! 💙👊#LSGvMI #IPL2025 #HardikPandya #Cricket #Sportskeeda pic.twitter.com/wI4NZ81sGG
— Sportskeeda (@Sportskeeda) April 4, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)