TATA IPL Points Table 2025 Update: लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करून नोंदवला दुसरा विजय, येथे पाहा अपडेटेड पॉइंट्स टेबल

मुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौने मुबंईसमोर 204 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईचा संघ 20 षटकात 5 गडी गमावून 191 धावा करु शकला.

TATA IPL Points Table 2025 Update: लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करून नोंदवला दुसरा विजय, येथे पाहा अपडेटेड पॉइंट्स टेबल
IPL 2025 (Photo Credit - X)

Lucknow Super Giants vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 16 वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Lucknow Super Giants vs Mumbai Indians) यांच्यात भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ (Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium, Lucknow) येथे खेळवला गेला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव करत या हंगामातील दुसरा विजय नोंदवला आहे. त्याआधी, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौने मुबंईसमोर 204 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईचा संघ 20 षटकात 5 गडी गमावून 191 धावा करु शकला. या रोमांचक विजयानंतर लखनौने सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. तर मुंबई सातव्या स्थानावर आहे. तसेच पंजाब पहिल्या, दिल्ली दुसऱ्या, बंगळुरु तिसऱ्या आणि गुजरात चौथ्या स्थानावर आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 04, 2025 11:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).