Sachin Tendulkar, Sunil Gavaskar on 'Matoshree' to meet Chief Minister Uddhav Thackeray

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) आणि लिटिल मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) हे दोन दिग्गज क्रिकेटपटू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर दाखल झाले आहेत. 'मातोश्री' (Matoshree) हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेयांचे खासगी निवासस्थान आहे. हे दोन्ही माजी क्रिकेटपटू एकाच वेळी मातोश्रीवर पोहोचल्याने अनेक तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहेत. दरम्यान, या भेटीचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्यामुळे ही भेट राजकीय आहे की खासगी याबाबतचा तपशीलही बाहेर आला नाही.

दरम्यान, एबीपी माझा या वृत्तवाहीनीने याबात वृत्त दिले आहे. राज्यात अत्यंत नाट्यपूर्णरित्या राजकीय सत्तांतर झाले. शिवसेना, राष्ट्रावादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकासआघाडी सरकार स्थापन केले. या सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आले असून, मुख्यमंत्री म्हणून ते या सरकारचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना भेटणारी प्रत्येक व्यक्ती आणि भेट यावर प्रसारमाध्यमांचे बारीक लक्ष असते. (हेही वाचा, शिवसेनेच्या 10 रुपयांमध्ये सकस जेवण योजनेला महाविकास आघाडीकडून शिक्कामोर्तब; लवकरच सुरु होणार 50 केंद्रे)

शिवसेना ट्विट

आजवर उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख होते. त्यामुळे शिवसेना या पक्षाचा गाडा ते निवासस्थान 'मातोश्री' आणि शिवसेना भवन या दोन ठिकाणांहून हाकत. परंतू, आता ते मुख्यमंत्री झाल्यामुळे राज्यशकट आणि पक्ष संघटन अशा दोन्हींची जबाबदारी उद्धव यांना पार पाडावी लागणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी या आधीही विविध लोक मातोश्रीवर जात असत. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून विविध विषय त्यांच्या कानावर घालत असत. मात्र, मुख्यमंत्री झाल्यापासून ते निर्णयप्रक्रियेतही सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांना भेटणाऱ्या लोकांचे आणि बैठकांचे महत्त्व अधिक वाढले आहे. सचिन तेंडूलकर आणि सुनील गावस्कर यांच्या भेटीमागेही असेच काही कारण असल्याची चर्चा रंगली आहे. पण, या भेटीतील तपशील बाहेर आल्यानंतरच अनेक बाबी पुढे येऊ शकतील.