Congress Leader Sachin Sawant (PC - ANI)

Sachin Sawant On Bhagat Singh Koshyari: मुंबई पोलीसांना बदनाम करणाऱ्या, मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करुन गलिच्छ भाषेत अपमान करणाऱ्या कंगना राणावतला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी भेट दिली, याचा खेद वाटतो. महामहीमांवर दबाव होता का? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केला आहे.

सचिन सावंत यांनी आपल्या ट्विट अकाऊंटवरून राज्यपाल तसेच भाजपवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. या पोस्टमध्ये सचिन सावंत यांनी म्हटलं आहे की, 'जरी महामहीमांनी तीला भेट दिली तरी ज्या त्वरेने अजोय मेहतांना बोलावणे धाडले. तशीच तीची कान उघाडणी केली असती तरी महाराष्ट्राच्या जनतेला आनंद झाला असता. पण महामहीम आसनस्थ होण्याआधी बसून तीने आमच्या महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही आदर राखला नाही.याची खदखद आमच्या मनात व जनमानसात आहे. महामहीम राज्यपाल उत्तराखंडचे असले तरी आता ते सर्वस्वी महाराष्ट्राचे आहेत. तसेच ते संविधानाच्या दृष्टिने महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहेत. सर्वांनाच त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यातही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा रक्षणाची जबाबदारी राज्याचे प्रमुख राज्यपालांची असते, असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -Primary School Admission: शालेय प्रवेश वयोमर्यादेत पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश)

मुंबई पोलीसांना बदनाम करणाऱ्या, मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करुन गलिच्छ भाषेत अपमान करणाऱ्या कंगना राणावतला त्यांनी तातडीने भेट दिली याचा खेद वाटतो. महामहीमांवर दबाव होता का? हा संदेह जनतेत आहे. असो! असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.