Education l purpose Only | Photo Credits: Pixabay.com

शालेय प्रवेशासाठी (Primary School Admission) मुलाच्या वयोमर्यादेची अट किती असावी याबाबत सातत्याने धोरणबदल होत आहे. इयत्ता पहिलीच्या वर्गात (Class I) प्रवेश मिळविण्यासाठी मुलाच्या वयाची सहा वर्षे पूर्ण असावीत ही प्रमुख अटक आहे. यापुढे आता शालेय प्रवेशासाठी 31 डिसेंबरपर्यंतचे वय गृहीत धरले जाणार आहे. जे या पुर्वी 15 ऑक्टोबरपर्यंतचे होते. त्यामुळे वयाची सहा वर्षे पूर्ण ही अटक कागदोपत्री राहणार असल्याचे दिसते. तसेच, सहा वर्षे पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळत असला तरी प्रत्यक्षात मात्र साडेपाच वर्षे वयाची मुलेही शालेय शिक्षणाचा श्रीगणेशा (Five And A Half Years Old Will Also Get Entry In The First Class) करताना दिसणार आहेत.

शालेय शिक्षणास इयत्ता पहिलीपासून सुरुवात करताना मुलांच्या कोणत्या वर्षापासून सुरुवात करवाी याबाबत अनेकदा खल झाला आहे. त्यानुसा वय वर्षे 6 निश्चित करण्यात आले. त्यासाठी 31 जुलै पर्यंत वयाची 6 वर्षे पूर्ण असलेल्या मुलांना प्रवेशासाठी योग्य मानले गेले. परंतू, त्यामुळे प्रश्न असा निर्माण झाला की मग जी मुले 15 ऑगस्ट पर्यंत जन्माला आली आहेत त्यांचे केवळ 15 दिवसांसाठी शालेय वर्ष बाद करायचे का? त्यामुळे अनेक पालकांनी प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे पालकांच्या मागणीचा विचार करत सरकारने 2017 मध्ये पुन्हा विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाच्या वयोमर्यादेत बदल केला. 31 सप्टेंबर पर्यंत 6 वर्षे पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल हे जाहीर केले. परंतू, पुन्हा ऑक्टोबर महिन्यातील मुलांचे करायचे काय हा प्रश्न पुढे आलाच. हा खेळ 2010 पासून सुरुच आहे. (हेही वाचा, Varsha Gaikwad On School Reopening In Maharashtra: महाराष्ट्रात सप्टेंबर अखेरीस शाळा पुन्हा सुरू होण्याची शक्यता नाही: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड)

अखेर सर्व बाबींचा विराच करुन पुढील शैक्षणिक वर्षांपासून (2021/22) 31 डिसेंबपर्यंत सहा वर्षे पूर्ण होत असलेल्या मुलांना जूनमध्ये पहिलीच्या वर्गात बसवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे नियमाच्या चौकटीत जरी 6 वर्षे वयाचा उल्लेख असला तरी तो केवळ कागदोपत्रीच राहणार आहे. त्यामुळे साडेपाच वर्षांच्या मुलांना 6 वर्षे वयाच्या मुलांसोबत अभ्यासक्रमाचे धडे गिरवत भार सोसावा लागणार आहे.

दरम्यान, शालेय प्रवेशासाठी (इयत्ता पहिली) विद्यार्थ्याची शारीरिक क्षमता, कारक क्षमता, आकलनविषयक क्षमता विकसित होणे आवश्यक असते. साधारणपणए असे मानले जाते की, वय वर्षे 6 पूर्ण असलेल्या मुलाची ही क्षमता विकसीत झालेली असते. अक्षरओळख, अंकओळख किंवा औपचारिक शिक्षण तुलनेत पूर्ण झालेले असते. त्यामुळे त्या मलाला अभ्यासक्रमाचा भार विशेष जाणवत नाही. मात्र, आता साडेपाच वर्षांच्या मुलांना शालेय प्रवेश द्यायचे म्हटले तर या मुलांची क्षमता 6 वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीने असेलच असे सांगता येत नाही. त्यामुळे या मुलांवर अभ्यासक्रमाचा भार पडू शकतो असे तज्ज्ञ सांगतात.

दरम्यान, पालकांचे म्हणने असे की, चार, सहा महिन्याच्या फरकामुळे मुलाचे एक संपूर्ण वर्ष वाया जाते. तसेच केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांमध्ये मुलांना इयत्ता पहिलीत साडेपाच वर्षांतच प्रवेश दिला जातो. त्या तुलनेत राज्य मंडळासाठी सहा वर्षांची अट असल्याने सीबीएसई शाळांच्या तुलनेत राज्य मंडळाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचे एक वर्षाचे नुकसान होते. भविष्यात राष्ट्रीय परीक्षा, सैन्य भरतीच्या प्रवेश परीक्षांमध्ये मुलांना एक वर्षाची झळ सोसावी लागते. असा पालकांचा आक्षेप आहे.