बॉलिवूडमधील क्विन कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने नुकतेच ट्वीटकवरुन ट्वीट करत मुंबई बद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यात तिने मुंबई ही पाकव्याप्त कश्मीर असल्याचा उल्लेख केल्याने तिच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे. यामध्ये काही बॉलिवूड कलाकारांसह राजकीय नेत्यांनी सुद्धा तिला तिच्या या विधानावरुन चांगलेच सुनावले आहे. दुसऱ्या बाजूला कंगना हिने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मला मुंबईत येण्यासंदर्भात धमकी दिल्याचे ही म्हटले आहे. या सर्व एकूणच गोष्टी पाहता कंगना हिच यामध्ये चुकीची असल्याचे चहूबाजूंनी बोलले जात आहे. परंतु विरोधी पक्षातील काही नेत्यांनी कंगना हिची बाजू घेत तिला मुंबईत येण्यासह राहण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी आता राज्यसभेचे खासदार रामदास आठवले यांनी सुद्धा ट्विट करत कंगना हिच्या बाजूने वक्तव्य केले आहे.(‘कंगना रनौतवर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार’- आमदार प्रताप सरनाईक)
रामदास आठवले यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री कंगना रनौतला तिचे मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचाही अधिकार आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही. कंगना राणावत ला आरपीआय संरक्षण देईल असे ही आठवले यांनी स्पष्ट केले आहे. यामधून एकूणच असून दिसून येते की रामदास आठवले यांनी कोणाचेही नाव न घेता सत्तेत असलेल्या सरकारवर टीका ही केली आहे.('एअरपोर्टवर गर्दी जमवून स्वत: प्रकाशझोतात राहायचे असा कंगनाचा किळसवाणा प्रयत्न, तिला मानसोपचारतज्ज्ञांचे उपचार सुरु करावेत'- अमेय खोपकर)
लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री कंगना राणावतला तिचे मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचाही अधिकार आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही. कंगना राणावत ला आरपीआय संरक्षण देईल@KanganaTeam@CMOMaharashtra @rautsanjay61
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 4, 2020
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आज कंगना रनौत हिच्यावर टीका केली आहे. कंगना महाराष्ट्राचा अपमान करत आहे. तिचं असं वक्तव्य म्हणजे तिला कोणत्यातरी राजकीय पक्षाचा, केंद्रातील सत्तेकडून पाठिंबा मिळाल्याने केल्याचा दावा त्यांनी केला आहे.सोबतच यामध्ये राजकीय षडयंत्र असल्याचा दावा देखील संजय राऊतांनी केला आहे. यामुळे मुंबई आणि मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन केली जात असल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्या बाजूला कंगनाने सांगितले आहे की, 9 सप्टेंबर रोजी ती मुंबईत येत आहे. जर कोणाच्या बापाची हिम्मत असेल तर मला अडवून दाखवा, असेही ती म्हणाली आहे.