गेले काही आठवडे अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावर आपले विचार व्यक्त करत आहे. त्यानंतर आता तिची जीभ मुंबई पोलीस (Mumbai Police) व मुंबई (Mumbai) शहरावर घसरली आहे. मुंबई पोलिसांची आपल्याला भीती वाटते, असे ती म्हणाली होती. इतकेच नाही तर मुंबईची तुलना तिने ‘पाकिस्तानव्याप्त काश्मीर’ शी केली. कंगनाच्या या वक्यव्यामुळे महाराष्ट्रामधील नेत्यांमध्ये, पक्षांमध्ये, जनतेमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. अनेकांनी कंगनाच्या या ट्वीटवर खरपूस टीका केली आहे. आता शिवसेनेचे आमदार (Shiv Sena MLA) प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी ‘ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत’, असे ट्वीट केले आहे.
कंगनाने 'मूव्ही माफिया' पेक्षा मुंबई शहरातील पोलिसांची जास्त भीती वाटत आहे,’ असे ट्वीट केले होते. त्यावर संजय राऊत यांनी तू मुंबईमध्ये येऊ नकोस असा सल्ला दिला. याच गोष्टीमुळे कंगनाने ‘मुंबई ‘पाकिस्तानव्याप्त काश्मीर’सारखी भासत आहे’, असे ट्वीट केले. त्यानंतर कंगनावर टीकांचा भाडीमार व्हायला सुरुवात झाली.
प्रताप सरनाईक ट्वीट -
कंगनाला खासदार @rautsanjay61 नी सौम्य शब्दांत समज दिली.ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे.
— Pratap Sarnaik (@PratapSarnaik) September 4, 2020
आता आमदार प्रताप सरनाईक यांनीही ट्वीट द्वारे कंगनावर टीका केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, ‘कंगनाला संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे.’
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही, ‘कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपले महाराष्ट्र व मुंबई पोलीस दल सक्षम आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्रीचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांना मुंबईत रहाणं सुरक्षित वाटत नाही, त्यांना मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही.’ असे म्हटले आहे. (हेही वाचा: 'एअरपोर्टवर गर्दी जमवून स्वत: प्रकाशझोतात राहायचे असा कंगनाचा किळसवाणा प्रयत्न, तिला मानसोपचारतज्ज्ञांचे उपचार सुरु करावेत'- अमेय खोपकर)
आता कंगनाने माहिती दिली आहे की, येत्या 9 सप्टेंबरला ती मुंबईमध्ये येणार आहे. ‘कोणाच्या बापाची हिम्मत असेल तर अडवून दाखवा, असे ट्वीट केले आहे.’