लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोक-या गेल्या. हातावर पोट असलेल्या अनेक जण बेरोजगार झाले. त्यामुळे अशा परिस्थितीत ग्राहकांना बिल पाठवून त्यांच्या जखमांवर मीठ चोळल्यासारखे आहे, असा विचार करत महावितरणाने (MSEB) ग्राहकांना गेले काही महिने वीज बिल पाठवले नव्हते. मात्र आता महाराष्ट्र अनलॉकच्या टप्प्यात आल्यामुळे थकित वीजबिलांची वसुली करण्याचे महावितरणाने ठरवले आहे. उद्यापासून ही थकित वीज बिलांची वसुली केली जाणार आहे.
महावितरणाने गेल्या वर्षीपासून मे 2021 वीज बिलांची वसुली केली नव्हती. विरोधकांनी वीज बिल माफ करण्यात यावी अशी मागणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता ही थकित बिल वसुली केली जाणार आहे. त्यामुळे खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे.हेदेखील वाचा- विजेचे दर कमी करा, शेतक-यांना दिवसा 8 तास वीज देण्याचे ऊर्जामंत्र्यांचे महावितरणाला निर्देश
2020 मधील 4099 कोटी, एप्रिल 2021 मध्ये 849 कोटी, तर मे 2021 मध्ये 1386 कोटी वीज बिल वसुल करायची आहे. उद्यापासून म्हणजेच 11 जूनपासून वीज बिल वसुली करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे. वीजनिर्मिती आणि कर्जाच्या बोज्यामुळे महावितरण संकटात आली असून ही बिल वसुली पुन्हा सुरु केली जाणार आहे.
महाराष्ट्रात कोरोना संकट काळामध्ये वाढीव वीज बिलं महावितरण कंपन्यांनी दिल्याने अनेकांनी संताप व्यक्त करत वीज दर कमी करण्याचे, वाढीव बीलांचा पुन्हा विचार व्हावा अशी मागणी केली होती मात्र महावितरण कंपन्यांनी वीज बिल न भरल्यास कनेक्शन कापण्याची धडक कारवाई सुरू केली होती. मात्र त्याचे तीव्र पडसाद उमटू लागल्याने महावितरण कंपनी आता एक पाऊल मागे घेतले आहे. आता कनेक्शन तोडण्याऐवजी बिल भरण्याची विनंती ग्राहकांना केली जात आहे. वीज बीलाची एकरकमीपेक्षा हप्त्यांच्या माध्यमातून पूर्तता करण्यासाठी आवाहन केलं जात आहे.
महाराष्ट्रात एकदाही वीज बिल न भरलेल्यांची संख्या ४१ लाख ७ हजार घरगुती ग्राहकांसह विविध वर्गवारीतील ८० लाख ३२ हजार ग्राहक इतकी आहे. आता वीज कंपन्यांकडून सार्यांनाच सुरूवातीला बीलाच्या 2% रक्कम भरा आणि उर्वरीत रक्कम हप्त्याने भरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यासाठी उपविभाग कार्यालयांमध्ये अर्ज करण्याचं आवाहन देखील करण्यात आले आहे.