Nitin Raut (Photo Credit: ANI)

विजेचे दर दिवसेंदिवस वाढत चालले असून महावितरणाचे बिल पाहून सर्वसामान्यांना जोरदार झटका बसला आहे. सामान्य जनतेच्या खिशाला हे दर परवडणारे नसून राज्यात विजेचे दर कमी करण्यासाठी आणि शेतक-यांना दिवसा 8 तास वीजपुरवठा देण्याचे नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिले आहेत. आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत नितीन राऊतांनी महावितरणाला (MSEB) हे निर्देश दिले आहेत. वीजबिलाचा वाढता जाणारा आकडा पाहून सामान्य जनता भरडली जात आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

शेतक-यांना शेतीसाठी जास्त प्रमाणात वीज लागते. त्यामुळे नवीन कृषिपंप वीज धोरणात शेतक-यांना 8 तास दिवसा वीज देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार, महावितरणाने योजना आखावी असे निर्देश नितीन राऊतांनी दिले आहे.हेदेखील वाचा- Nalasopara Shokcer!!! वीज बिलाची रक्कम पाहून वाढले ब्लडप्रेशर,तुम्ही सुद्धा व्हाल शॉक

त्याचबरोबर "राज्यातील उद्योगांचे वीज दर कमी करणे गरजेचे आहे.त्यामुळे वीजदर किमान 1 रुपया प्रति युनिटने कमी करण्यासाठी प्रयत्न करावे आणि सोबतच घरगुती व वाणिज्यिक दरही कमी करण्यासाठी नियोजन करा," असेही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राल शॉक देणारी धक्कादायक घटना आज नालासोपारा परिसरात घडली. आजा नालासोपारा येथील 80 वर्षीय गणपत नाईक यांना 80 कोटींचे विजेचे बिल आले. हे बिल पाहून त्यांना धक्का बसला. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. MSEDCL यांना ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी विजेचे बिल योग्य करुन दिले. विजेचे कोटी रुपयांचे आलेले बिल पाहून त्यांचा बीपी वाढला आणि त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी महावितरण कंपन्यांनी वीज बिल न भरल्यास कनेक्शन कापण्याची धडक कारवाई सुरू केली होती. मात्र त्याचे तीव्र पडसाद उमटू लागल्याने महावितरण कंपनी आता एक पाऊल मागे घेतले आहे. आता कनेक्शन तोडण्याऐवजी बिल भरण्याची विनंती ग्राहकांना केली जात आहे. वीज बिलाच्या एकरकमीपेक्षा हप्त्यांच्या माध्यमातून पूर्तता करण्यासाठी आवाहन केलं जात आहे.