रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) पीएमसी बॅंकेंवर (PMC Bank) पुढील 6 महिन्यांसाठी निर्बंध घातले आहे. यानंतर बॅंकेच्या आर्थिक व्यवहारांवर मर्यादा आल्याने खातेदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालं आहे. ठेवीदारांना आता दर दिवसा केवळ 1000 रूपये काढू शकणार आहेत. तसेच त्यानुसार, बॅंकांना आता कर्ज देणं, ठेवी स्वीकारणं यासह मोठ्या आर्थिक व्यवाहारांवर निर्बंध येणार आहेत. मुंबई: PMC बँकेवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून पुढील 6 महिन्यांसाठी निर्बंध; ठेवीदारांना केवळ 1000 रूपये काढण्याची मुभा
खातेदारांमध्ये का आहे भीतीचं वातावरण?
अनेक खातेदार त्यांच्या अकाऊंटला EMI लिंक केलेले असतात. तर काही खातेदारांनी फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवलेले असतात. पुढील काही आठवड्यामध्ये त्यांची पॉलिसी मॅच्युअर होणार आहे. तर काही खातेदारांना इतर बॅंकेमध्ये त्यांचे लोन ट्रान्सफर करणार होते. जेव्हा रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने PMC बॅंकेवर निर्बंध घातल्याने आता वरीलपैकी कोणताच व्यवाहार होऊ शकत नाही. सध्या दर दिवसाला पैसे काढण्याच्या रक्कमेवर मर्यादा आल्याने खातेदारांमध्ये गोंधळ आहे. अनेकांना आता आर्थिक चणचण जाणवत असल्यास दुसरा पर्याय पहावा लागणार आहे.
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने का घातले निर्बंध?
बॅंक रेग्युलेशन अॅक्टनुसार, रिझर्व्ह बॅंक इंडियाकडे काही विशेष अधिकार आहेत. त्यानुसार, सहकारी बॅंकांचे व्यवहार थेत त्यांच्याकडे घेतले जाऊ शकतात. आरबीआयअने PMC बॅंकेवर निर्बंध घातल्याचे ठोस कारण दिले नसले तरीही बॅंकेमध्ये अर्थिक व्यवाहारांमध्ये अनियमितता असल्याचं म्हटलं आहे. नव्या मॅनेजमेटकडून आर्थिक संकट दूर करण्याची क्षमता असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर हा निर्बंध आरबीआय उठवू शकतो.
आता काय होणार?
पीएमसी बॅंकेकडून एमडी जॉय थॉमस यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅंकेसमोर असलेले व्यवहार आणि संकट पुढील 6 महिन्यांत दूर होण्याची शक्यता आहे. सध्या खातेदारांना होत असलेल्या त्रासाची आम्हांला जाणीव आहे, त्याची आम्ही माफी मागतो. सध्या खातेदारांसाठी बॅंक नियमित वेळेमध्ये सुरू राहणार आहे. ग्राहकांनो तुमचे पैसे सुरक्षित हातांमध्ये असल्याचं बॅंकेने सांगितले आहे.
सध्या पीएमसी बॅंक खातेदारांना एकत्र येण्याची, आपल्या मागण्या आरबीआयसमोर ठेवण्याची गरज आहे. हे प्रकरण आता न्यायालयामध्येही घेऊन जाता येऊ शकतं. पण तसे केल्यास त्यावर सुनावणी आणि पुढील किचकट प्रक्रिया पार पडण्यासाठी खूप वेळ लागू शकतो.