मुंबई: PMC बँकेवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून पुढील 6 महिन्यांसाठी निर्बंध; ठेवीदारांना केवळ 1000 रूपये काढण्याची मुभा
PMC Bank customers aggrieved over RBI's restrictions | (Photo Credits: Twitter/@AjitRbsm15)

आरबीआयने (Reserve Bank of India) आज ( 24 सप्टेंबर) मुंबई मधील पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंक (PMC) वर पुढील 6 महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यानुसार, बॅंकांना आता कर्ज देबं, ठेवी स्वीकारणं यासह मोठ्या आर्थिक व्यवाहारांवर निर्बंध येणार आहेत. तसेच आरबीआयने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, आता खातेदार केवळ 1000 रूपयांची रक्कम काढू शकणार आहेत. आज अचानक आलेल्या बातमीमुळे मुंबईत अनेक ठिकाणी पीएमसी  बॅंकेच्या शाखांसमोर ठेवीदारांनी गर्दी केली आहे. तसेच सोशल मीडियावर देखील नागरिकांनी आपला रोष व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे.

पीएमसी  बॅंकेची सद्यस्थिती पाहता ठेवीदारांचया हितासाठी आता बॅंकेवर निर्बंध घालणं गरजेचे असल्याचं आरबीअयने म्हटले आहे. आरबीआयच्या आदेशाप्रमाणे आता 23 सप्टेंबरपासून या बॅंकेला आरबीआयच्या मान्यते शिवाय नवं कर्ज देणं, जुन्या कर्जाचं नुतनीकरण करणं, बॅंकेने गुंतवणूक करणं, नव्या ठेवी स्वीकारणं अशा गोष्टी करता येणार नाहीत.

सोशल मीडियामधील प्रतिक्रिया

पुढील सहा महिन्यासाठी बँकेला कर्मचाऱ्यांचे पगार, जागेचे भाडे, कर, विज बिल, प्रिंटिंग व स्टेशनरी. पत्रव्यवहार कायदेशीर खर्च यासाठी खर्च करता येईल. तसेच या काळात बँकेच्या ठेवीदारांना आपल्या सर्व प्रकारच्या खात्यांमधून फक्त हजार रूपये काढण्याची मुभा आहे. ठेवीदारांच्या ठेवीची मुदत संपत असेल तर ही ठेव त्या व्यक्तीच्या नावाने व त्याच व्याजदराने पुन्हा गुंतवता येण्यास परवानगी देण्यात आली आहे असे आरबीआयने सांगितले आहे.