कुख्यात गँगस्टर रवी पुजारी याचा ताबा आता मुंबई पोलिसांना (Ravi Pujari in Mumbai Police Custody) मिळाला आहे. त्यामुळे त्याच्यावर असेल्या अनेक गुन्ह्यांची उकल करण्यास मदत होणार आहे. प्राप्त माहितीनुसार रवी पुजारी ((Ravi Pujari ) याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 49 गुन्हे दाखल आहेत. आगोदर तो कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात होता. कर्नाटकमध्येही त्याच्यावर विविध गुन्हे आहेत. आता तो मुंबई पोलिसांच्याही (Mumbai Police) ताब्यात आला आहे.
रवी पुजारी याच्यावर आतापर्यंत महाराष्ट्रात 49 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 26 गुन्हे हे मोक्का कायद्यांतर्गत दाखल आहे. प्रामुख्याने 2016 मध्ये मुंबई येथील विलेपार्ले परिसरातील गजाली हॉटेल बाहेर खंडणी प्रकरणात गळीबार केला होता. या प्रकरणात पोलिसांनी त्या वेळी 7 जणांना अटक केली होती. या गुन्ह्यातही रवी पुजारी मुंबई पोलिसांना हवा होता. (हेही वाचा, Ravi Pujari: अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोलिसांना परवानगी)
मूळचा कर्नाटक राज्यातील उडपी जिल्ह्यात असलेल्या मालपे येथे 1970 मध्ये रवी पुजारी याचा जन्म झाला. अगदी अल्पवयीन असतानाच रवी पुजारी हा गुन्हेगारी वर्तुळात सहभागी झाला. सुरुवातीच्या काळात तो छोटा राजन टोळीसाठी काम करत होता. पुढे त्याने स्वत:ची टोळी बनवली. या टोळीच्या माध्यमातून तो मुंबई, बंगळुरू आणि मँगलोर योथाल विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यवसायिकांना धमकावने त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे, खंडणीसाठी हस्तकांकरवी हल्ले करणे असे विविध उद्योग त्याने सुरु केले. त्याने बॉलिवूडमध्येही खंडणी मागितल्याचा आणि प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट आणि अली मोरानी यांच्या हत्येचा कटही रचल्याचा त्याच्यावर गुन्हा आहे.