रत्नागिरी: गणपतीपुळे येथील समुद्रात पोहण्यासाठी गेलेले 3 जण बुडाले, दोघांचे मृतदेह सापडले
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

रत्नागिरी (Ratnagiri)  मधील गणतीपुळे (Ganpatipule)  येथील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकमंडळी राज्याच्या विविध भागातून येतात. तसेच गणपतीपुळ्याचा निळाशार समुद्राचा आनंद लुटण्यासाठी येथे सुद्धा पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते. तर आज सकाळी या समुद्रात 3 जण बुडाले असल्याची घटना घडली आहे.

कोल्हापूर येथील तीन तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात पोहण्यासाठी सकाळच्या वेळेस गेले होते. मात्र समुद्रात गेलेल हे तिघेही बुडाले असल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. समुद्रात बुडालेल्यांपैकी दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर अद्याप एक जण बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.(काशिद समुद्रावर पर्यटनासाठी आलेले दोन पर्यटक बुडाले)

समुद्रात पोहण्यासाठी गेलेले तीन जण हे कसबा बावडा येथे राहणारे असल्याचे सांगण्यात येत आहे. तर काही दिवसांपू्र्वीसुद्धा मुंबईतील तीन तरुणी कॉलेजनंतर धबधब्यावर गेल्या होते. तेव्हा त्या तिघी धबधब्यात बुडाल्याची घटना घडली होती. नागरिकांना भरतीच्या वेळी समुद्रात न जाण्याचे आवाहन केले जाते. तरीही याकडे दुर्लक्ष केल्याने असे प्रकार घडल्याचे समोर आले आहेत.